IND Vs ENG: Only one heart is successful, how many times will you win? India's opener gives a special gift to a 12-year-old fan; Watch the video
IND Vs ENG : एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध दूसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने चांगलीच पकड जमवली आहे. सामन्यात ४ दिवसांचा खेळ पूर्ण झाला असून आतापर्यंत भारताने इंग्लिश संघावर दबदबा राखला आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवशी ४२७ धावांवर डाव घोषित केला आणि भारताने ६०७ धावांची आघाडी घेतली होती. प्रतिउत्तरात इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवशी खेळ संपला इंग्लंडने ३ विकेट गमावून ७२ धावा केल्या आहेत.
या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करताना दिसत आहे. एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ८७ धावांची दमदार खेळी केली. तर तो दुसऱ्या डावात २२ धावांवर बाद झाला. या दरम्यान त्याने असे काही करून दाखवले की, ज्यामुळे आता सर्वजण त्याचे कौतुक करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा : IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत विराट-रोहित दिसणार एकत्र; मोठी अपडेट आली समोर..
एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वालच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. यशस्वी त्याच्या लहान रवी नावाच्या चाहत्याला भेटला आहे. तसेच त्याने त्याच्या १२ वर्षांच्या चाहत्यासोबत रवीशी संवाद देखील साधला. रवी डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण त्याला क्रिकेटमध्ये खूप जास्त रस आहे. यामुळेच त्याला एजबॅस्टन येथे जयस्वालला भेटायची इच्छा होती. त्यानंतर यशस्वीने त्याला त्याची बॅट देखील भेट दिली.
जयस्वालकडून रवीला बॅट भेट देण्यात आली आणि म्हणाला की, “माझ्याकडे तुमच्यासाठी एक भेट आहे आणि मी तुम्हाला माझी बॅट भेट देऊ इच्छितो. ती तुम्ही जपून ठेवा. तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला.” यानंतर रवीकडून जयस्वालला उत्तर देण्यात आले की, “तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला आणि तुमचे खूप खूप आभार. तुम्ही एक उत्तम खेळाडू आहात आणि तुमची बॅट घेण्यासाठी मी खूप जास्त उत्सुक आहे.” रवी आणि जयस्वालचा हा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला असून आता टो व्हायरल होत आहे.
Meet 12-year old Ravi – He is blind but an avid cricket follower 🫡
He had one wish – to meet Yashasvi Jaiswal and his wish came true this morning at Edgbaston 🫶🏼🥹#TeamIndia | #ENGvIND | @ybj_19 pic.twitter.com/ykvZU5aQ0m
— BCCI (@BCCI) July 5, 2025
हेही वाचा : BCCI च्या मोठ्या निर्णयानंतर, नितीश राणा नवीन लीगमध्ये खेळताना दिसणार, लिलावात यू-टर्नमुळे लागली बोली
भारताकडून ४२७ धावांवर दुसरा डाव घोषित करण्यात आला. त्यानंतर, चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ३ विकेट गमावून ७२ धावा केल्या आहेत. यादरम्यान जॅक क्रॉली ०, बेन दत्ता २५ आणि जो रूट २६ धावांवर माघारी परतले. भारताकडून आकाश दीपने २ आणि मोहम्मद सिराजने चौथ्या दिवशी १ विकेट घेतली. आज ६ जुलै हा कसोटीचा शेवटचा दिवस असणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला जिंकण्यासाठी ७ बळींची गरज असून त्याच वेळी, इंग्लंडला दुसरी कसोटी जिंकण्यासाठी ५३६ धावा कराव्या लागणार आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.