IND Vs ENG: England beat India by 22 runs in Lord's Test; Jadeja's fight in vain, Saheb takes 2-1 lead in the series.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात १९२ धावा करून भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य दिले. धावांचा पाठलाग करताना मात्र भारताचा डाव १७० धावांवर गडगडला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करून भारताला धावांवर गारद करून तिसरा कसोटी सामना जिंकला. भारताकडून रवींद्र जडेजाने सयंमी अर्धशतक ठोकून झुंज दिली. त्याला भारतीय टेलेंडर्सनी चांगली साथ दिली.परंतु तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयासह इंग्लंडने अँडरसन- तेंडुलकर ट्राफित २-१ ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : सनरायझर्स हैदराबादची IPL 2026 साठी मोठी डरकाळी! ‘या’ माजी गोलंदाजाच्या खांद्यावर दिली मोठी जबाबदारी..
इंग्लंडच्या १९३ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी मैदानात उतरला. भारताची सुरवात खूप वाईट झाली. यशस्वी जैस्वाल शून्यावर जोफ्रा आर्चरचा शिकार ठरला. त्यांनतर सलामीवीर केएल राहूल आणि करुण नायर यांनी काही वेळ डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र नायरला कार्सने १४ धावांवर बाद करून इंग्लंडला यश मिळवून दिले आहे. त्यानंतर संघाचा कर्णधार शुभमन गिल फलंदाजीसाठी आला मात्र तो मैदानावर तग धरू शकला नाही. त्याला ६ धावांवर कार्सने बाद केले. त्यांनतर नाईट वॉचमन म्हणून आकाश दीप मैदानात आला. मात्र त्याला देखील स्टोक्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतने ४ विकेट्स गमावून ५८ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवसाची सुरवात झाली तेव्हा भारताला १३५ धावांची गरज असताना मैदानात राहुल आणि पंत खेळत होते. तेव्हा ऋषभ पंत ९, केएल राहुल ३९, वॉशिंग्टन सुंदर ०, नितीश कुमार रेड्डी ३, जसप्रीत बुमराह ४, मोहम्मद सिराज ४ धावांवर माघारी परतले तर रवींद्र जडेजा ६१ धावांवर नाबाद राहिला. आतपर्यंत इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर कार्स २, कार्स आणि वोक्सने प्रत्येकी १ विकेट घेतली. या विजयाने अँडरसन- तेंडुलकर ट्राफित इंग्लंडने २-१ अशी आघाडी मिळवली.
England win a thriller 🔥
Agony for India as they fall short by 22 runs.#WTC27 #ENGvIND 📝: https://t.co/0NCkPJdBEk pic.twitter.com/bD1MkrqvjZ
— ICC (@ICC) July 14, 2025
तत्पूर्वी, इंग्लंडने तिसऱ्या दिवशीच्या अखेरीस बिनबाद २ धावावरून चौथ्या दिवसाचा खेळ सुरु केला. तेव्हा इंग्लडची सुरवात फारसी चांगली झाली नाही. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट १२ धावांवर आउट झाला. त्यानंतर ऑली पोपला ४, झॅक क्रॉली २२, हॅरी ब्रुक २३, जो रूट ४०, हॅरी बेन स्टोक्स ३३, जेमी स्मिथ ८, ख्रिस वोक्स ८, कार्स १, शोएब बशीर २ धावा करून बाद झाले, तर जोफ्रा आर्चर ५ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंड १९२ धावांवर सर्वबाद झाला. त्यांनी भारताला १९२ धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने शानदार कामगिरी केली. त्याने २२ धावा देत सर्वाधिक ४ बळी मिळवले. तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २, नितीश कुमार रेड्डी आणि आकाश यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : IND Vs ENG : आर्चरमुळे भारत अडचणीत; पंत मागोमाग सुंदरचा अप्रतिम झेल टिपत दाखवला बाहेरचा रस्ता, पहा व्हिडीओ