IND vs ENG: England's unique record against India; Only achieved 'such' feat once in 93 years..
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. भारतीय संघाने इंग्लंडला जिंकण्यासाठी ३७१ धावांचे लक्ष्य दिले आहे. पहिली कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला आता ११८ धावा कराव्या लागणार आहे. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याने शानदार शतक झळकावून इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहचवले आहे. तसेच जॅक क्रॉलीने देखील अर्धशतक करून त्याला चांगली साथ दिली आहे. अशातच गेल्या ९३ वर्षांत, टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या ५९० कसोटी सामन्यांमध्ये, फक्त एकदाच संघ भारताविरुद्ध ३७० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठू शकला आहे.
इंग्लंड संघाने हा पराक्रम केला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने २०२१ मध्ये भारताविरुद्ध ३७८ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले होते. या दरम्यान इंग्लंडने फक्त ३ गडी गमावले होते. इंग्लंडच्या विजयात जॉनी बेअरस्टोने ११४ आणि जो रूटने १४२ धावा काढल्या होत्या. ज्यामध्ये इंग्लंडने ७६.४ षटकांत लक्ष्य गाठले होते.
कसोटी सामन्यांमध्ये भारताविरुद्ध यशस्वीरित्या पाठलाग करणारा दुसरा संघ ऑस्ट्रेलिया ठरला आहे. त्यांनी सर्वोच्च ३३९ धावसंख्येचा पाठलाग केला होता. १९९७ मध्ये पर्थच्या वाका मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८७.२ षटकांत आठ गडी गमावून ३३९ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले होते. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज टोनी मानने दुसऱ्या डावात १०५ धावा चोपल्या होत्या. तसेच पाचव्या क्रमांकाचा फलंदाज पीटर टूहेने १४० चेंडूत ८३ धावा काढल्या होत्या.
इंग्लंड आता लीड्स येथील पहिल्या कसोटीत पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या जवळ पोहचला आहे. इंग्लंडला आता हा सामना जिंकण्यासाठी १३० पेक्षा देखील कमी धावांची आवश्यकता आही. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर तो भारताविरुद्ध दोनदा हा पराक्रम करणारा पहिला संघ ठरणार आहे.