बेन डकेट(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. हेडिंग्ले येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य दिले आहे. परंतु पाचव्या दिवशी लंचनंतर देखील इंग्लंडची गाडी सुसाट आहे. इंग्लंडचा सालामीवीर बेन डकेटनए शानदार शतक झळकावले आहे. त्याने जॅक क्रॉली (५९) सोबत आपले शानदार भागीदारी करत इंग्लंडला मजबूत स्थितित पोहचवले आहे. बेन डकेटने १२६ चेंडूचा सामना करत नाबाद १०५ धावा केल्या आहेत. सदया पावसाच्या व्यत्ययाने खेळ थांबवण्यात आला आहे. इंग्लंडच्या या दोन्ही सलामीवीर फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज हतबल झालेले दिसत आहेत. इंग्लंडला १९० धावांची आवश्यकता आहे तर भारताला १० विकेट्स विजयासाठी गरजेच्या आहेत.
इंडिया पूर्णपणे बॅकफूटवर आली आहे. लंचच्या वेळी, इंग्लंडने भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी झुलवले आणि विकेट न गामावता होता ११७ धावा केल्या होत्या. दोन्ही सलामीवीरांनी यजमान संघासाठी मजबूत पाया रचला आणि प्रति षटक ३.९० धावांच्या दराने धावा काढल्या.
लंचच्या वेळी, जॅक क्रॉली ४२ धावांवर फलंदाजी करत होता तर दुसऱ्या बाजूने बेन डकेट ६४ धावांवर खेळत होता. शेवटच्या दिवशी, तुलनेने सोप्या वाटणाऱ्या खेळपट्टीवर, बुमराहसह कोणताही भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांवर नियंत्रण मिळवता आले नाही. एकंदरीत, जर टिम इंडियाच्या टेल-एंडर्सनी दुसऱ्या डावात चांगला खेळ दाखवला असता तर एकूण आघाडी ३७१ ऐवजी ४५० च्या जवळपास नक्कीच राहिली असती.
परंतु, आता टिम इंडियाची स्थिति वाईट झाली आहे. जसप्रीत बूमराह असो वा मोहम्मद सिराज कुणालाच विकेट घेण्यात अद्याप यश आलेले नाही. तसेच प्रसिद्ध कृष्णा आणि रविद्र जाडेजा या दोघांना देखील काही खास जमले नाही. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आहेत. दोघांनी १८१ धावांची अभेद्य भागीरदारी रचली आहे.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.