फोटो सौजन्य - BCCI Women
भारत विरुद्ध इंग्लड T20 मालिका : भारतीय महिला संघ इंग्लडविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळत आहे. या मालिकेचे दोन सामने आतापर्यत झाले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवुन टीम इंडीयाने मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यामध्ये स्मृती मानधना हिने शतक झळकावले होते आणि विक्रम नावावर केला होता. हरमनप्रीत कौरने संघामध्ये पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यामध्ये ती खेळली नव्हती या त्यामुळे स्मृती मानधना हिने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये आज मालिकेचा तिसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारताचा संघ हा मालिकेमध्ये 2-0 अशा आघाडीवर आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना मध्यरात्री सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 11.00 सुरु होणार आहे, तर या सामन्याचे नाणेफेक 10.30 मिनिटांनी होणार आहे.
IND vs ENG : रवींद्र जडेजाने संघाच्या हितासाठी मोडला BCCI चा हा नियम, आता शिक्षा होणार?
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये 11.00 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स वर प्रक्षेपित होणार आहे. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे.
आता सर्वांच्या नजरा मोठ्या फलंदाजी करणारी सलामीवीर शेफाली वर्मावर आहेत, जी आपली छाप सोडण्यास उत्सुक असेल. संघात परतलेल्या शेफालीने पहिल्या दोन सामन्यांमध्ये एकूण २३ धावा केल्या आहेत.
Bristol ➡️ London 🚍
Bus. Travel. And Memories galore #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/ovenbLE3P3
— BCCI Women (@BCCIWomen) July 3, 2025
सराव सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाल्यानंतर खबरदारी म्हणून पहिल्या सामन्यात खेळू न शकलेली कर्णधार हरमनप्रीत दुसऱ्या सामन्यात फक्त दोन चेंडूंचा सामना करू शकली आणि तिलाही मैदानावर काही वेळ घालवायचा आहे. रेणुका सिंग आणि पूजा वस्त्रकर या वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजी आक्रमणाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, सायली सातघरे, दीप्ती शर्मा, क्रांती गौर, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, राधा यादव.
नॅटली सायव्हर-ब्रंट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट (विकेटकीपर), सोफिया डंकली, एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनी व्याट-हॉज, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, पेज शालफिल्ड, एम आर्लॉट, लॉरेन बेल, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फिलर, लिन्सी स्मिथ, इस्सी वोंग.