IND vs ENG: Ishan Kishan's 'unavailable' message even before his return to Team India! What exactly happened? Read in detail..
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ३५८ धावा उभ्या केल्या आहेत. प्रतिउत्तरात इंग्लंडनेचांगली सुरवात करत दुसऱ्या दिवसाअखेर २ विकेट गमावून २२५ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला पहिल्या दिवशी पायाला दुखापत झाली होती, तरी देखील त्याने मैदानात उतरून गुरुवारी (२४ जुलै) ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध ७६ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या. आता त्याच्याऐवजी संघात ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करत आहे. त्यामुळे पंतला पाचव्या कसोटीत आराम देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या जागी इशान किशनचे नाव पुढे आले.परंतु, त्याने निवड होण्यापूर्वीच शेवटच्या सामन्यातून माघार घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने निवड समितीला निवडीसाठी आपण उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, ईशान किशनने असे का केले असावे. चला आपण जाणून घेऊया नेमकां काय झाले आहे.
हेही वाचा : Anaya Bangar : काय सांगता? अनाया बांगर बनणार पुन्हा मुलगा? संजय बांगरच्या मुलीने केला मोठा खुलासा..
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, इशान किशनच्या हा स्कूटीचा अपघात झाला होता. तेव्हा तो स्कुटीवरून पडला होता. त्यामुळे त्याच्या डाव्या पायाला 10 टाके पडल्याची माहिती आहे. गुरुवारीच त्याचे टाके काढण्यात आलेया सून सध्या त्याच्या डाव्या घोट्यावर प्लास्टर केलेले आहे. त्यामुळे दोन वर्षांनी त्याच्याकडे संधी चालून आली असताना देखील त्याला संघात स्थान मिळवता येणार नाही. त्यामुळे त्याच्या स्वप्नांना पु्न्हा हुलकावणी मिळाली आहे. त्यामुळे ऋषभ पंतच्या जागी तामिळनाडूच्या एन जगदीसनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
इशान किशनला आता भारतीय संघात स्थान मिळणं कठीण मानले जात आहे. कारण टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा बघायला मिळत आहे. ऋषभ पंतची टी20 संघातील जागा ही निश्चित नसली तरी अशात केएल राहुल आणि संजू सॅमसन हे निवडकर्त्यांची पहिली पसंती असण्याची दाट शक्यता आहे. त्यात बॅकअप म्हणून टी20 क्रिकेटमध्ये जितेश शर्मा आणि वनडे क्रिकेटमध्ये ऋषभ पंत यांचे नाव सर्वात पुढे आहे. इशान किशन 2023 वनडे वर्ल्डकपनंतर भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळला आहे. मात्र त्यानंतर त्याला एकही सामना खेळता आलेला नाही. दरम्यान, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही काळ खेळून काढला आहे. तसेच आयपीएल २०२५ मध्ये देखील त्याला धावांसाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे.
हेही वाचा : तेंदुलकर, कोहली आणि एमएस धोनी यांची कमाई ऐकून व्हाल चकीत! रवी शास्त्रींनी केला खुलासा