अनाया बांगर(फोटो-सोशल मीडिया)
Anaya Bangar : माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येते. तिच्याबाबत अनेक बातम्या समोर येत असतात. आता पुन्हा एकदा तिच्याबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनाय बांगर ही आधी मुलगा होती, मात्र तिने जेंडर चेंज ऑपरेशन करून ती आर्यनची आता अनाया बनली आहे. मात्र आता ती अनाया पुन्हा मुलगा होणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. या बातमीरवर आता खुद्द अनायाने आपली चुप्पी तोडली आहे. तिने आता चाहत्यांशी थेट संवाद साधत सर्व स्पष्टच सांगितले आहे. तसेच तिने नेब्रेस्ट ऑग्मेंटेशन (स्तन वाढवणे) आणि ट्रेकियल शेव्ह ही शस्त्रक्रिया केली असून याबाबत देखील तिने माहिती दिली आहे.
हेही वाचा : तेंदुलकर, कोहली आणि एमएस धोनी यांची कमाई ऐकून व्हाल चकीत! रवी शास्त्रींनी केला खुलासा
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सोशल मीडियावर लाईव्ह येऊन चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असते. अशातच तिने पुन्हा एकदा लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत चर्चा करत होती. तेव्हा एका चाहत्याने तिला विचारले की, “तू पुन्हा मुलगी ते मुलगा होशील का?”. यावर तात्काळ उत्तर दिले. ती म्हणाली, “कधीच नाही”. या लाईव्हदरम्यान चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले आहेत. अनायाने सर्व प्रश्नांची उत्तम उत्तरे दिली. तसेच अनाया बांगरने अलीकडेच तिच्यावर बनवण्यात आलेल्या माहितीपटाच्या रिलीजबद्दल देखील मोठी माहिती दिली.
अनाया बांगरवर नुकतीच ब्रेस्ट ऑग्मेंटेशन आणि ट्रेकियल शेव्ह शस्त्रक्रिया करण्यात आली. घशाचे हाड मऊ होण्यासाठी श्वासनलिका शेव्ह शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर ब्रेस्ट ऑग्मेंटेशनने तिच्या या शारीरिक परिवर्तन प्रक्रियेला आणखी पुढच्या टप्प्यात पोहचवले आहे. अनाया बांगरने केलेली ही शस्त्रक्रिया तिच्या लिंग बदलाच्या प्रवासातील एक मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे. अनायाने यापूर्वी यूकेमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि जेंडर-अफर्मिंग शस्त्रक्रिया केली होती, याद्वारे तिने तिचे लिंग बदलले होते.
कोण आहे अनाया बांगर?
संजय बांगर यांची मुलगी असलेली अनाया एकेकाळी मुलगा होती. त्याचे नाव आर्यन बांगर असे होते. तिला पूर्वी क्रिकेटपटू आर्यन बांगर म्हणून ओळखले जात असे. आता अनाय बांगरने जेंडर चेंज ऑपरेशन करून ती आर्यनची आता अनाया बनली आहे.