IND vs ENG: Jamie Smith is unstoppable! He did a great job at Lord's; He became the fastest to reach 1000 runs in Test cricket
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असून या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ४ गडी गमावून २५१ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने ७ गडी गमावून ३५३ धावा केल्या आहेत. जो रूटने आपले शतक पूर्ण केले. तसेच या सामन्यात इंग्लंडचा विकेटकीपर जेमी स्मिथने मोठी कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १००० धावा करणारा जेमी स्मिथ पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर, तो संयुक्तपणे सर्वात कमी डावात असे करणारा पहिला फलंदाज आहे.
जेमी स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करण्याच्या विकेटकीपर-फलंदाजाच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधून इतिहासाची नोंद केली. लॉर्ड्सवर सुरू असलेला भारत-इंग्लंड सामना हा स्मिथचा १३ वा कसोटी सामना असून त्याने फक्त २१ डावात १००० कसोटी धावांचा टप्पा गाठला आहे. शुक्रवारी कसोटीत १००० धावा पूर्ण करण्यासाठी स्मिथला तीन धावांची आवश्यकता होती आणि त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या ८७ व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून हा विक्रम केला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : जो रूट एक्सप्रेस सुसाट! लॉर्ड्सवर शतक ठोकताच रचला इतिहास; असे करणारा ठरला जगातील एकमेव फलंदाज..
डावांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जेमी स्मिथने क्विंटन डी कॉकची बरोबरी साधली आहे. डी कॉकने त्याच्या २१ व्या डावात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. जेमी स्मिथने त्याच्या २१ व्या डावात ही कामगिरी पूर्ण केली आहे.
२१ क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
२१ – जेमी स्मिथ (इंग्लंड)
२२ – दिनेश चंडिमल (श्रीलंका)
२२ – जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)
२३ – कुमार संगकारा (श्रीलंका)
२३ – एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
२४ – जेफ दुजोन (वेस्ट इंडिज)
स्मिथपूर्वी, इंग्लंडसाठी सर्वात जलद १००० कसोटी धावा पूर्ण करण्याचा विक्रम जॉनी बेअरस्टोच्या खात्यावर जमा होता. बेअरस्टोला कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी २२ डाव खेळले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा टप्पा (डावांमध्ये) करण्याचा एकूण विक्रम इंग्लंडच्या हर्बर्ट सटक्लिफ आणि वेस्ट इंडिजच्या एव्हर्टन वीक्स यांच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी सटक्लिफ आणि वीक्स दोघांनाही प्रत्येकी १२ डावांची गरज भासली होती. सामन्यांच्या बाबतीत, हा विक्रम डोनाल्ड ब्रॅडमनच्या नावावर जमा आहे. कसोटीत १००० धावा करण्यासाठी ब्रॅडमनला फक्त ७ कसोटी सामने लागले.