नितीश कुमार रेड्डी(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियासाठी संमिश्र राहिला होता. सामना सुरु होण्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ४ गडी गमावून २५१ धावा केल्या होत्या. त्याआधी, टीम इंडियासाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली होती. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने एकाच षटकात इंग्लंडच्या दोन बड्या खेळाडूंना माघारी पाठवले. या कामगिरीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे.
नितीश कुमार रेड्डीने त्याच्या पहिल्याच षटकात दोन गडी बाद केले. त्याने त्याच्या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर बेन डकेटला आपली शिकार बनवले. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने जॅक क्रॉलीलाही चालता केले. यासह, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १८ वर्षांनंतर टीम इंडियासाठी एक मोठी कामगिरी केली आहे.
लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा युवा गोलंदाज नितीश कुमार रेड्डी याने इरफान पठाणनंतर १८ वर्षांनी मोठा पराक्रम केला आहे. आता तो २००२ नंतर कसोटी सामन्यात पहिल्याच षटकात दोन विकेट मिळवणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, इरफान पठाणने कराची कसोटीमध्ये पहिल्याच षटकात पाकिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेऊन मोठा भीम पराक्रम केला होता.
आता १८ वर्षांनंतर, २०२५ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर नितीश कुमार रेड्डीने ही कामगिरी केली. यादरम्यान, त्याने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेन डकेटला यष्टीरक्षक ऋषभ पंतकडून झेलबाद केले. यानंतर, त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, त्याने पुन्हा जॅक क्रॉलीला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद करून आपली शिकार बनवले.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला जडेजा! टॉप 5 मध्ये केला प्रवेश
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लिश फलंदाज जो रूटने शानदार फलंदाजीचा नमुना पेश केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो १९१ चेंडूंचा सामना केल्यानंतर ९९ धावांवर नाबाद होता. आता तिसऱ्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाली आहे. रूटला शतक करण्यासाठी त्याला १ धाव हवी होती. त्याने बुमराहच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावून आपले ३७ वे शतक पूर्ण केले. हवी आहे. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्स नाबाद ३९ धावांवरून तिसऱ्या दिवशी पुढे खेळताना तो ५ धावांची भर घालू शकला. त्याला जसप्रीत बुमराहने ४४ धावांवर माघारी पाठवले.
त्याच वेळी,पहिल्या दिवशी ऑली पोप ४४ धावा, जॅक क्रॉली १८, बेन डकेट १८ आणि हॅरी ब्रुक ११ धावा करून बाद झाले होते. पहिल्या दिवशी टीम इंडियाकडून नितीश कुमार रेड्डीने २ विकेट घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तर बुमराहने दुसऱ्या दिवशी अजून एक विकेट काढली.