IND vs ENG: Jasprit Bumrah never stops! Created history in the fourth Test; He is the first to perform 'this' Bhima feat in England..
Jasprit Bumrah creates history in Manchester Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने मोठी कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथला बाद करून एक विक्रम रचला आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराहने या सामन्यात १९ चेंडूत नऊ धावा देऊन जेमी स्मिथला बाद करून आपला पहिला बळी टिपला. या विकेटसह त्याने आपले ५० बळी देखील पूर्ण केले. बुमराहचा इंग्लंडमधील हा ११ वा कसोटी सामना असून जर बुमराहने या सामन्यात आणखी दोन बळी मिळवले तर तो इशांत शर्माचा ५१ बळींचा विक्रम मोडीत काढू शकतो. या कामगिरीने तो इंग्लंडमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज बनणार आहे.
इशांतने नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळाला होता. त्याने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या १५ कसोटी सामन्यांमध्ये ५१ फलंदाजांना माघारी पाठवले आहे. इशांतने इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध १४ कसोटी आणि इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळला आहे. बुमराहने भारताकडून इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध (जून २०२१ मध्ये साउथहॅम्प्टनमध्ये) एक कसोटी सामना खेळला आहे, परंतु त्या सामन्यात त्याला एकही बळी मिळवता आला नव्हता.
बुमराहला या मालिकेत इंग्लंडमध्ये सर्वात यशस्वी आशियाई कसोटी गोलंदाज बनण्याची संधी देखील असणार आहे. यासाठी बुमराहला आणखी चार बळी घ्यावे लागणार आहेत. आतापर्यंत हा विक्रम पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज आणि माजी कर्णधार वसीम अक्रमच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. त्याच्या १७ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत अक्रमने इंग्लंडमध्ये १४ कसोटी सामने खेळले आणि ५३ फलंदाजांना आपली शिकार बनवले आहे.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test : गंभीर-गिल जोडी कुलदीप यादवकडे दुर्लक्ष का करत आहे? प्रशिक्षकाने सांगितले कारण
बॉलरचे नाव देश सामने विकेट्स सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी