जोरिच व्हॅन शाल्क्विक(फोटो-सोशल मीडिया)
SA U19 vs ZIM U19: South Africa’s Zoric hits record double century : दक्षिण आफ्रिकेचा १८ वर्षीय फलंदाज जोरिच व्हॅन शाल्कविकने युवा एकदिवसीय सामन्यात मोठा कारनामा केला आहे. जोरिच हा युवा एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. हरारे येथे खेळवण्यात आलेल्या झिम्बाब्वे अंडर-१९ विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात २१५ धावा करून व्हॅन शाल्कविकने इतिहास घडवला आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी व्हॅन शाल्कविकने डावाची सुरुवात केली होती. त्याने १५३ चेंडूत १९ चौकार आणि ६ षटकार ठोकत २१५ धावा फटकावल्या. व्हॅन शाल्कविकच्या आधी, युवा एकदिवसीयच्या एका सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम श्रीलंकेच्या हसिता बोयागोडा यांच्या नावावर जमा होता. २०१८ मध्ये केनियाविरुद्ध त्याने १९१ धावा केल्या होत्या. आता हा विक्रम जोरीचने मोडला आहे.
हेही वाचा : India vs England 4th Test : टीम इंडियाला सामना गमावण्याचा धोका, गिल अँड कंपनी मँचेस्टरमध्ये मालिकाही हरणार?
व्हॅन शाल्कविकने जेसन रॉल्स (७६) सोबत तिसऱ्या विकेटसाठी १७८ धावा आणि पॉल जेम्स (२२ चेंडूत ४१ धावा) सोबत चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. शाल्कविकने ८६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या ३० व्या षटकात त्याने शतकाला गवसणी घातली. त्यानंतर, पुढील १०० धावांसाठी त्याने केवळ ५९ चेंडूंचा सामना केला. ४५ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर, व्हॅन शाल्कविकने शेल्टन मॅझविटोरेराच्या चेंडूवर चौकार मारून त्याने विक्रमी २०० धावांचा टप्पा ओलांडला.
२२ जुलै २०२५ रोजी, बांगलादेशविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या अंडर-१९ सामन्यातमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जोरिक व्हॅन शाल्कविकने शानदार कामगिरी करत १५६ चेंडूत नाबाद १६४ धावा फाटकावल्या होत्या. या डावात त्याने १४ चौकार आणि ४ षटकार मारले होते. हा सामना बेनोनी येथे खेळवण्यात आला होता.
हेही वाचा : IND vs ENG : कसोटी क्रिकेटमधून जसप्रीत बुमराह निवृत्त होणार का? मोहम्मद कैफच्या व्हिडिओने खळबळ
भारताचा तडाखेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांमध्ये ७८ चेंडूत १४३ धावा केल्या होत्या. त्याने ५ जुलै २०२५ रोजी वॉर्सेस्टर येथे इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध १४३ धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात त्याने फक्त ५२ चेंडूत आपले शतक पूर्ण करून युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडीत काढला होता.