IND vs ENG: Joe Root's panic after Tendulkar-Ponting in Test cricket; History created by breaking Kallis-Dravid's record in Manchester
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या ३५८ धावांच्या प्रतिउत्तरात इंग्लंडने चांगली सुरवात केली आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने लंचब्रेकपर्यंत २ गडी गमावून ३३२ धावा केल्या आहेत. ऑली पोप ७० तर जो रूट ६३ धावांवर खेळत आहेत. या दरम्यान इंग्लंडच्या दिग्गज फलंदाज जो रूटने इतिहास रचला आहे. त्याने जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांचा विक्रम मोडीत काढला आहे. जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज बनला आहे. त्याने मँचेस्टरमध्ये ही विक्रमी कामगिरी केली आहे.
हेही वाचा : IND vs ENG : Joe Root ची गाडी काही थांबेना! मँचेस्टरमध्ये रचला इतिहास; ‘असे’ करणारा बनला जगातील पहिला फलंदाज
डिसेंबर २०१२ मध्ये नागपूर येथे भारताविरुद्ध इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण करणाऱ्या जो रूटला सध्याच्या चौथ्या भारत-इंग्लंड कसोटीत द्रविड आणि कॅलिस यांचा विक्रम मोडण्यासाठी केवळ ३१ धावांची आवश्यकता होती. त्याने तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सकाळच्या सत्रात ३१ धावा हा या दोन दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे.
भारताच्या दिग्गज फलंदाज राहुल द्रविडने १९९६ ते २०१२ पर्यंत एकूण १६४ कसोटी सामने खेळेल आहेत. यामध्ये त्याने एकूण १३,२८८ धावा केल्या आहेत. तर साऊथ आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने १६६ सामन्यांमध्ये १३,२८९ धावा करून आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट केला होता. आता जो रूटने दोन दिग्गजांना मागे टाकले आहे. आता त्याचे लक्ष पॉन्टिंग आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर असणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये सुरू असलेला चौथा कसोटी सामना हा रूटचा १५७ वा कसोटी सामना आहे. या काळात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३७ शतके आणि ६६ अर्धशतके झळकावली आहेत. आता त्याच्या खात्यावर कसोटी क्रिकेटमध्ये १३,२९० धावा जमा आहेत.
भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम जमा आहे. या महान उजव्या हाताच्या फलंदाजाने १९८९ ते २०१३ दरम्यान भारतासाठी २०० कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने १५,९२१ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगने कसोटी क्रिकेटमध्ये १३,३७८ धावा केल्या असून तो कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या स्थानावर आहे. जो रूटला पॉन्टिंगचा विक्रम मोडण्यासाठी या सामन्यात १२० धावा कराव्या लागणार आहे. जो रूट मँचेस्टर सामन्यात पॉटिंगचा विक्रम मोडणार का? हे बघणे रंजक असणारा आहे.
हेही वाचा : IND vs ENG : बेन स्टोक्सने मँचेस्टरमध्ये रचला इतिहास! ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या यादीत झाला सामील..