बेन स्टोक्स(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळाला जात आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ३५८ धावा उभारल्या केल्या आहेत. तर प्रतिउत्तरात इंग्लंड संघाने दुसऱ्या दिवशी दमदार सुरवात करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २ विकेट गमावून २२५ धावा केल्या होत्या. तत्पूर्वी इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स पटकावला आहेत. त्याने आपल्या गोलंदाजीने भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले आहे. यासह, त्याने एक मोठा पराक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १० किंवा त्याहून अधिक शतके आणि पाच किंवा त्याहून अधिक पाच बळी घेणारा बेन स्टोक्स आता जगातील चौथा खेळाडू बनला आहे.
बेन स्टोक्सच्या आधी अशी मोठी कामगिरी जगातील केवळ तीन खेळाडूंच्या नावावर जमा आहे. ज्यांनी १० पेक्षा जास्त कसोटी शतके आणि पाच किंवा त्याहून अधिक पाच विकेट्स घेतलेल्या आहेत. पण मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात ५ विकेट्स घेऊन बेन स्टोक्स देखील या दिग्गजांच्या यादीत सामाविष्ट झाला आहे.
हेही वाचा : अखेर IOA च्या CEO चा वाद संपुष्टात! क्रीडामंत्र्यांनी केली मध्यस्थी; डोपिंगच्या सामन्यासाठी पॅनेलची स्थापना
चार दिग्गजांमध्ये, सर गॅरी सोबर्सचे नाव आघाडीवर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये २६ शतकांसोबत त्याने सहा वेळा पाच बळी देखील टिपले आहेत. त्यानंतर, इयान बोथम १४ शतके आणि २७ पाच विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस तिसऱ्या स्थानावर आहे. कॅलिसने ४५ शतके आणि पाच वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. आता बेन स्टोक्स देखील या विशेष यादीमध्ये सामील झाला आहे. बेन स्टोक्सने १३ शतके आणि पाच वेळा पाच विकेट्स घेण्याची किमया साधली आहे.