जो रुट(फोटो-सोहल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळाला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारताने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ३५८ धावा केल्या आहेत. तर प्रतिउत्तरात इंग्लंड संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २ विकेट गमावून २२५ धावा केल्या होत्या. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने मोठा विक्रम रचला आहे. तो ओल्ड ट्रॅफर्डवर १००० कसोटी धावा पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या कामगिरीने रूटने इतिहसा रचला आहे.
हेही वाचा : अखेर IOA च्या CEO चा वाद संपुष्टात! क्रीडामंत्र्यांनी केली मध्यस्थी; डोपिंगच्या सामन्यासाठी पॅनेलची स्थापना
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान, जो रूटने २२ धावा पूर्ण करताच ही कामगिरी करून दाखवली आहे. या मैदानावर १००० धावां पूर्ण करण्यासाठी रूटला २२ धावांची आवश्यकता होती. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५३ व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर त्याने ही कामगिरी केली आहे. या मैदानावर जो रूटचा हा १२ वा कसोटी सामना आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १२ कसोटी सामन्यांमध्ये रूटने एक शतक आणि सात अर्धशतके लगावली आहेत.
आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान असणाऱ्या रूटला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची चांगली संधी देखील मिळणार आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीचा शेवट ६८ अर्धशतकांवर केला आहे. तर इंग्लंडसाठी रूटच्या नावावर ६६ अर्धशतके जमा आहेत. जर रूटने चौथ्या कसोटीत शतक झळकावले तर तो भारताविरुद्ध १२ कसोटी शतके करणारा जगातील एकमेव खेळाडू ठरणार आहे.
हेही वाचा : IND vs ENG : बेन स्टोक्सने मँचेस्टरमध्ये रचला इतिहास! ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या यादीत झाला सामील..
भारताने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ३५८ धावा केल्या आहेत. तर प्रतिउत्तरात इंग्लंड संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २ विकेट गमावून २२५ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी मैदानावर जो रूट आणि ओली पोप टिकून आहे. जो रूट ४५ तर पोप ६२ धावांवर खेळत आहे. इंग्लडच्या २ बॅड ३१० धावा झालेल्या आहेत.