Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : चौथ्या दिवशी केएल राहुलचे दमदार शतक! इंग्लंडविरुद्ध भारताकडे २४० धावांची भक्कम आघाडी.. 

भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे पहिला  सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील चौथ्या दिसशी भारताच्या केएल राहुलने दमदार शकत ठोकले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 23, 2025 | 07:36 PM
IND Vs ENG: KL Rahul's powerful century on the fourth day! India has a strong lead of 240 runs against England..

IND Vs ENG: KL Rahul's powerful century on the fourth day! India has a strong lead of 240 runs against England..

Follow Us
Follow Us:

IND Vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या  कसोटी मालिकेला २० जून पासून सुरवात झाली आहे.  हेडिंग्ले, लीड्स येथे पहिला  सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटी पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एकूण ४७१ धावा केल्या होत्या. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या तिघांनी दमदार शतकं ठोकली आहेत. प्रतिउत्तरात इंग्लंडने ऑली पोपचे शतक आणि हॅरी ब्रूकच्या ९९ धावांच्या जोरावर ४६५ धावा केल्या होत्या. तेव्हा भारताला ६ धावांची आघाडी मिळाली होती. त्यांतर भारत दुसऱ्या डावात फलंदाजीला आला आणि तिसऱ्या दिवसाअखेर  भारताने २ विकेट गमावून ९० धावा करून ९६ धावांची आघाडी घेतली होती. चौथ्या दिवशी भारताकडून केएल राहुलने दमदार शतक झळकावले आहे. त्याच्या शतकाने भारताला सामन्यात भक्कम आघाडी मिळवून दिली आहे.

हेही वाचा : County Cricket : इंग्लंडमध्ये इशान किशनचा धूमधडाका! पदार्पणाच्या सामन्यातच स्फोटक खेळीने गाजवले मैदान; पाहा Video

चौथ्या दिवशी भारताने ९० धावांवरून पुढे खेळायला सुरवात केली. केएल राहुलने ४७ धावांवरून खेळायला सुरवात केली तेव्हा सावध पवित्रा घेतला होता. त्याच्या सोबत संघाचा कर्णधार शुभमन गिलने ६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरवात केली. परंतु त्यामध्ये तो केवळ १० धावांची भर घालु शकला. त्याला ब्रायडन कार्सने १६ धावांवर बाद केले. त्यानंतर  संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत मैदानात फलंदाजील आला. पंत आणि राहुल यांनी अतिशय चतुराईने फलंदाजी करत धावा जमवायला सुरवात केली. या दरम्यान केएल राहुलने आपले शतक पूर्ण केले. तो आता १०४ धावांवर खेळत आहे. तर ऋषभ पंत ९५ धावांवर खेळत आहे. भारताला २६० धावांची आघाडी मिळाली आहे.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी भारताने ६ धावांच्या आघाडीसह फलंदाजीला सुरवात केली. तेव्हा भारताची सुरवात चांगली राहिली नाही. भारताने १६ धावांवर पहिली विकेट गमावली. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ४ धावांवर बाद झाला. त्याला ब्रायडन कार्सने बाद केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आला पहिल्या डावात शून्यावर बाद होणारा साई सुदर्शन. त्याने केएल राहुलसोबत आश्वासक सुरवात केली. साई सुदर्शन सेट होत असल्याचे दिसत असताना त्याला ३० धावांवर बेन स्टोक्सने आपला शिकार बनवले. त्यानंतर तिसऱ्या दिवसाअखेर केएल राहुल(४७) तर गिल ६ धावांवर नाबाद राहुल भारताला ९६ धावांची आघाडी मिळाली होती.

💯 𝙛𝙤𝙧 𝙆𝙇 𝙍𝙖𝙝𝙪𝙡! 👏 👏 His 9⃣th TON in Test cricket 🙌 🙌 What a wonderful knock this has been! 👌 👌 Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @klrahul pic.twitter.com/XBr9RiheBR — BCCI (@BCCI) June 23, 2025   हेही वाचा : SL vs BAN : बांगलादेश संघ जाहीर! श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी..

 

हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

टीम इंडियाचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन,  करुण नायर,  रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,  प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.

 

Web Title: Ind vs eng kl rahuls powerful century on the fourth day india has a strong lead of 240 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 07:19 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • KL Rahul Captain
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND Vs NZ: अरे हा कॅच तुझा की माझा? सेट बॅट्समनला पडीकलकडून जीवदान, गिलची प्रतिक्रिया Viral
1

IND Vs NZ: अरे हा कॅच तुझा की माझा? सेट बॅट्समनला पडीकलकडून जीवदान, गिलची प्रतिक्रिया Viral

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियासाठी गूड न्यूज!  Rishabh Pant कमबॅकसाठी सज्ज; BCCI कडून ग्रीन सिग्नल
2

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियासाठी गूड न्यूज! Rishabh Pant कमबॅकसाठी सज्ज; BCCI कडून ग्रीन सिग्नल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.