IND vs ENG: Neither Anderson nor Stuart Broad..; Michael Vaughan chose 'this' player as the greatest bowler of all time..
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड या दोन संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात झाली आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. सामन्यापूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारताला लंच ब्रेक दोन गडी गमवावे लागले आहेत. अशातच माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉनने एक विधान केले आहे. ज्याची खूप जोरदार चर्चा होत आहे. त्याने सर्वकलीन महान गोलंदाजयाची निवड केली आहे. त्यावरून आता क्रीडा जगतात चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : IND vs ENG : भारतीय कसोटी संघाच्या ‘शुभमन युगा’ची सुरवात; साई सुदर्शनचे पदार्पण, तर करूण नायरचे जोरदार पुनरागमन
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान, माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉनने एक विचान केले आहे. वॉन म्हणाला की, जसप्रीत बुमराहला “सर्वकालीन महान” गोलंदाज म्हणून निवडले आह. तसेच त्याचे भरपूर कौतुक देखील केले आहे. मायकेल वॉन कौतुक करताना म्हणाला की, ‘जसप्रीत बुमराह प्रत्येक स्वरूपात स्वतःला सिद्ध करणारा गोलंदाज असणार आहे.’
जसप्रीत बुमराह हा भारताचा हुकमी एक्का आहे. त्याने भारतासाठी शानदार कामगिरी केली आहे. आताच्या क्रिकेट विश्वात बूमराह हा सर्वात घातक गोलंदाज आहे. त्याच्या अचूक यॉर्कर आणि सीम हालचालीने महान खेळाडूंची देखील भंबेरी उडाली आहे. अलिकडच्या काळात जसप्रीत बुमराह भारताचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज म्हणून समोर आला आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर देखील त्याच्या तेजतर्रार गोलंदाजीने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. आता मायकेल वॉनसारख्या महान गोलंदाजाने देखील त्याचे कौतुक करत त्याला सर्वकाली महान गोलंदाज म्हटले आहे.
सामन्याची स्थिती
लीड्स येथील हेडिंग्ले मैदनावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेकिचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहेत. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल फलंदाजी यांनी डावाची सुरवात केली होती. परंतु भारताला लंच ब्रेकआधी दोन झटके लागले आहेत. २५ व्या षटकात फटका मारण्याच्या नादात केएल राहुल स्लिपमध्ये झेल देऊन बसला. त्याने ७८ चेंडूचा सामना करत ४२ धावा केल्या. त्यात त्याने ८ चौकार लगावले. त्याला ब्रायडन कार्सने माघारी पाठवले. त्यानंतर साई सुदर्शन चौथ्या चेंडूवरच शून्यावर बाद झाला. त्याला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपला शिकार बनवले. भारतीय संघाने २ विकेट्सच्या बदल्यात १०५ धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जयस्वाल ४६ आणि चेंडूचा भारताचा कर्णधार शुभमन गिल १४ धावांवर खेळत आहे.