फोटो सौजन्य – X
रविंद्र जडेजाचा पराक्रम : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृती घेतल्यानंतर रविंद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधुन निवृती घेणार हे अशी अटकळ बांधली जात होती. पण त्याने असे केले नाही, तो सध्या भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेमध्ये खेळत आहे. त्याने दुसऱ्या सामन्यामध्ये कमालीचा खेळ दाखवला आणि संघासाठी 89 धावांची खेळी खेळली. काही सामन्यांमध्ये रविंद्र जडेजाची फार काही चांगली कामगिरी राहिली नाही त्यामुळे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.
एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात जडेजाने फलंदाजीने शानदार कामगिरी केली, त्यानंतर चाहत्यांना आता गोलंदाजीतही त्याच्याकडून अशाच चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. तथापि, एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना कमी मदत मिळते. त्याच वेळी, रवींद्र जडेजाने पहिल्या डावात ८९ धावांची खेळी खेळून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास रचला आहे. आतापर्यंत जगातील कोणत्याही खेळाडूला WTC मध्ये ही मोठी कामगिरी करता आलेली नाही.
IND vs ENG : हॅरी ब्रुकच्या माइंड गेममुळे भारतीय कर्णधाराचं हुकलं त्रिशतक? पहा Video
लीड्स कसोटीत रवींद्र जडेजा बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर त्याच्याबद्दल बरीच अटकळ होती की जडेजा संघातून वगळला जाऊ शकतो, परंतु निवडकर्त्यांनी आणि प्रशिक्षकांनी पुन्हा एकदा या खेळाडूवर विश्वास व्यक्त केला. आता WTC मध्ये, जडेजा २००० धावा करणारा तसेच १०० विकेट घेणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. आतापर्यंत WTC मध्ये कोणीही ही मोठी कामगिरी करू शकलेले नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये, जडेजाच्या नावावर आता फलंदाजी करताना २०१० धावा आणि बॉलिंग करताना १३२ विकेट आहेत.
RAVINDRA JADEJA IS THE ONLY CRICKETER TO HAVE 2000+ RUNS & 100+ WICKETS IN WTC HISTORY 🤯 pic.twitter.com/Vac10gHck7
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2025
एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 5 विकेट 211 धावांवर गमावल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने शुभमन गिलसह केवळ डाव सांभाळला नाही तर मोठ्या धावसंख्येचा पायाही रचला. या दोन्ही फलंदाजांमध्ये 203 धावांची भागीदारी झाली. पहिल्या डावात कर्णधार शुभमन गिल 269 धावा करून बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 587 धावा केल्या. पहिल्या डावात जडेजाचे शतक 11 धावांनी हुकले.
गोलंदाजीत टीम इंडियाची सुरुवात खूपच चांगली झाली आहे. पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस टीम इंडियाने इंग्लंडला ३ मोठे धक्के दिले होते. सध्या इंग्लंडचा स्कोअर ३ विकेटच्या मोबदल्यात ७७ धावा आहे. जो रूट १८ आणि हॅरी ब्रूक ३१ धावांवर नाबाद आहेत. दुसऱ्या दिवशी आकाश दीपने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.