Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : ‘प्रिन्स’ने मोडला ‘किंग’चा विक्रम! शुभमन गिलने ‘या’ बाबतीत विराट कोहली टाकले मागे, वाचा सविस्तर.. 

भारत आणि इंग्लंड यांच्या दूसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळवला जाता आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने २६९ धावांची खेळी करून माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 04, 2025 | 04:21 PM
IND Vs ENG: 'Prince' breaks 'King's' record! Shubman Gill leaves Virat Kohli behind in 'this' case, read in detail..

IND Vs ENG: 'Prince' breaks 'King's' record! Shubman Gill leaves Virat Kohli behind in 'this' case, read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळवला जात आहे.  या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने कर्णधार शुभमन गिलच्या २६९ धावा आणि जाडेजाच्या ८९ धावांच्या जोरावर भारताने ५८७ धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात इंग्लंड धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरली तेव्हा दिवसाच्या अखेर त्यांनी ३ गडी गमावत ७७ धावा केल्या होत्या. प्रथम फलदणजी करणाऱ्या भारताचा पहिल्या डावात चांगलाचा दबदबा दिसून आला. या कसोटी सामन्यात शुभमन गिलने कर्णधार म्हणून सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गिलने माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधाराने सर्वाधिक वैयक्तिक धावा काढल्याचा विक्रम आता शुभमन गिलच्या नावावर जमा झाला आहे. गिलच्या आधी हा विक्रम भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नोंदवला होता. गिलने एजबॅस्टन येथे सर्वाधिक म्हणजे २६९  धावा करून कोहलीचा विक्रम मोडला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये पुण्यातील एमसीए स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामना खेळला गेला. या दरम्यान, भारताचा कर्णधार म्हणून कोहलीने २५४ धावा फटकावल्या होत्या. तर, बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या गिलने २६९ धावा काढल्या आहेत. गिलने ३८७ चेंडूंचा सामना करत २६९ धावा केल्या. या खेळीत त्याने ३० चौकार आणि ३ षटकार लगावलेया आहेत.

हेही वाचा : IND vs ENG: आज बॅट चालली तर रूट रचणार इतिहास, हे 2 मोठे विक्रम नोंदवणार नावावर

दोन्ही फॉरमॅटमध्ये २०० धावा करणारा गिल तिसरा खेळाडू

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक करणारा गिल हा ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांच्यानंतर कसोटीत द्विशतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा जगातील तिसरा खेळाडू बनला आहे. १८ जानेवारी २०२३ रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात गिलने न्यूझीलंडविरुद्ध २०८ धावांची खेळी केली होती. तसेच १ फेब्रुवारी २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात किवी संघाविरुद्ध १२६ धावा केल्या होत्या.

गिल हा भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार

शुभमन गिलची २४ मे २०२५ रोजी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये ३७ वा कर्णधार ठरला आहे.  २० जून २०२५ रोजी लीड्समधील हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध त्याने कसोटी कर्णधार म्हणून सुरुवात केली आणि या सामन्यातील  पहिल्या डावात १४७ धावा केल्या होत्या. पण त्याचा संघर्ष मात्र व्यर्थ गेला कारण भारताला ३७१ धावांच्या लक्ष्याचा बचाव करता आला नाही. परिणामी मालिकेतील पहिला सामना ५ विकेट्सने भारताला गमवावा लागला.

हेही वाचा : IND vs ENG : ‘सर जडेजा’ च्या बरोबरीला नाही कोणी! WTC मध्ये खेळाडूने रचला इतिहास

 

Web Title: Ind vs eng prince breaks kings record shubman gill leaves virat kohli behind in this case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Shubhman Gill
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND vs AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडमध्ये गिल नापास; भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मलिका विजय
1

IND vs AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडमध्ये गिल नापास; भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मलिका विजय

IND vs AUS: किंग कोहलीला 50 वर्षांच्या इतिहासात चालून आली ‘विराट’ संधी! अ‍ॅडलेड ODI मध्ये घालणार धुमाकूळ  
2

IND vs AUS: किंग कोहलीला 50 वर्षांच्या इतिहासात चालून आली ‘विराट’ संधी! अ‍ॅडलेड ODI मध्ये घालणार धुमाकूळ  

IND VS AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित
3

IND VS AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित

IND vs AUS : गिल आर्मी अ‍ॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान
4

IND vs AUS : गिल आर्मी अ‍ॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.