Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : प्रिन्सचा क्रिकेट विश्वात डंका! ४ शतके झळकावत शुभमन गिलची ब्रॅडमन-गावस्करांच्या क्लबमध्ये एंट्री..

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने मोठा कारनामा केला आहे. त्याने शतक झळकावत एका कसोटीत सर्वाधिक शकत लावणाऱ्या ब्रॅडमन आणि गावस्कर यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 27, 2025 | 07:42 PM
IND vs ENG: Prince's shock in the cricket world! Shubman Gill enters the Bradman-Gavaskar club with 4 centuries..

IND vs ENG: Prince's shock in the cricket world! Shubman Gill enters the Bradman-Gavaskar club with 4 centuries..

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. इंग्लंडने भारताला पहिल्या डावात ३५८ धावांवर रोखले आहे. प्रतिउत्तरात इंग्लंडने सर्वबाद ६६९ धावा केल्या आणि ३११ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युउत्तरात भारताकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले. केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी चौथ्या दिवसाच्या अखेरचे ६० षटक खेळून काढत भारताला सामन्यात कायम राखले. पाचव्या दिवशी केएल राहुल बाद झाला.त्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. खेळीसह त्याने अनेक विक्रम मोडीत काढले आहे. अशातच त्याने एक मोठी कामगिरी केली आहे. मँचेस्टरमध्ये कसोटी शतक झळकावून गिलने कर्णधार म्हणून एका कसोटी मालिकेमध्ये चार शतके झळकावली आहेत. यासह त्याने सर डॉन ब्रॅडमन आणि महान सुनील गावस्कर यांची बरोबरी साधली आहे.

हेही वाचा : PHOTOS : इंग्लिश भूमीवर गिलने लावली विक्रमांची झडी; भारत-इंग्लंड मालिकेत प्रिन्ससह ‘या’ दिग्गजांच्या ७०० पेक्षा अधिक धावा..

भारताचा युवा कर्णधार शुभमन गिल सद्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चौथे शतक झळकावले आहे. कर्णधार म्हणून गिलने डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावस्कर यांच्या कसोटी मालिकेत चार शतके झळकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासामध्ये इतर कोणत्याही कर्णधाराने कसोटी मालिकेत चारपेक्षा जास्त शतके झळकावलेली नाहीत.

शुभमन गिलने २० जून २०२५ रोजी लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी कर्णधारपदी पदार्पण केले होते. शुभमन गिलने लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात १४७ धावा फटकावल्या होत्या. २ ते ६ जुलै दरम्यान एजबॅस्टन येथे खेळवण्यात आलेल्या भारत-इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलने पहिल्या डावात २६९ आणि दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी खेळली होती. त्याच वेळी, रविवारी (२७ जुलै) मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारताच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात गिलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये भारताचा कर्णधार म्हणून आपले चौथे शतक पूर्ण केले. भारतचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एकूण ९ डावात ७३२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी चार शतके झळकावलीमी होती. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध २०५, १०७, १२० आणि १८२ धावांच्या खेळी साकारल्या होत्या.

हेही वाचा : IND vs ENG: इंग्लंड-भारत कसोटीदरम्यान ‘या’ अष्टपैलू खेळाडूच्या अडचणीत वाढ! मायदेशी परतताच ५ कोटींचा दणका; नेमकं प्रकरण काय?

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके झळकावणारे क्रिकेटपटू

  1. क्लाइड वॉलकॉट (वेस्ट इंडिज) – ५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (१९५५)
  2. डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) – ४ विरुद्ध दक्षिण आफ्रिका (१९३१-३२)
  3. मोहम्मद युसूफ (पाकिस्तान) – ४ विरुद्ध वेस्ट इंडिज (२००६)
  4. सुनील गावस्कर (भारत) – ४ विरुद्ध वेस्ट इंडिज (१९७१)
  5. विराट कोहली (भारत) – ४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१४-१५) (कर्णधार म्हणून ३)
  6. जो रूट (इंग्लंड) – ४ विरुद्ध भारत (२०२१-२२) (कर्णधार म्हणून ३)
  7. शुभमन गिल (भारत) – ४ विरुद्ध इंग्लंड (२०२५)

Web Title: Ind vs eng shubman gill enters the bradman gavaskar club with 4 centuries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 07:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.