टिम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
Nitish Kumar Reddy’s popularity has increased: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा भाग असणाऱ्या अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी भारतात परतल्यानंतर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नितीश कुमार रेड्डीच्या एजंटकडून त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्याने ५ कोटी रुपयांची थकबाकी मागितल्याची माहीती आहे. नितीश रेड्डीकडून खेळाडूंचे व्यवस्थापन करणाऱ्या स्क्वेअर वन या कंपनीशी चार वर्षांचा करार करण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत अधिक माहिती अशी की, रेड्डीने २०२४-२४ मध्ये गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी दरम्यान स्वतःसाठी एका नवीन एजंटसोबत करार केला होता. आणि यासोबतच, जुन्या कंपनी स्क्वेअर वनसोबतचा त्यांचा चार वर्षांचा करार संपुष्टात आला आहे. तथापि, आता एजन्सीकडून नितीश कूमारवर थकबाकीची रक्कम न भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत, सनरायझर्स हैदराबादच्या स्टार खेळाडूवर कराराच्या अटींचे उल्लंघन करण्यात आल्याचा आणि थकबाकी न भरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test : ‘तरच कुलदीपला अंतिम ११ मध्ये संधी..’, बॉलिंग प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलचे मोठे विधान
नितीशकडून पैसे थकबाकीत का?
स्क्वेअर वन ही एजन्सी २०१२ पासून नितीश रेड्डीचे काम पाहत आली होती आणि या चार वर्षांत, कंपनीने नितीशला अनेक मोठ्या ब्रँडचे करार आणि जाहिराती मिळवून दिल्या आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “अशा सुमारे ९० टक्के वाद परस्पर संमतीने सोडवण्यात येतात आणि कोणत्याही पक्षाला न्यायालयात जाण्याची गरज पडत नाही. परंतु, या प्रकरणात, नितीशने पैसे देण्यास नकार दिला आहे की त्याने हे सर्व करार स्वतःहून घेतलेले आहेत. तसे, रेड्डी सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. तिसऱ्या कसोटीनंतर त्याला जिममध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या या मालिकेत मालिकेत १-२ ने पिछाडीवर पडला आहे.