IND vs ENG: Tendulkar-Anderson Trophy unveiled before first Test; Presence of 'these' two legends, see photos..
आज गुरुवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी इंग्लंडचा माजी गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हे दोघे उपस्थित होते.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचे नाव तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी असे असणार आहे. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेला पडौडी ट्रॉफी म्हणून ओळखले जात होते.
यापूर्वी ही मालिका पतौडी ट्रॉफीसाठी खेळवली जात होती. तिचे नाव इफ्तिखार अली खान पतौडी आणि त्यांचा मुलगा मन्सूर अली खान पतौडी यांच्या नावरून ठेवण्यात आले होते. तथापि, आता त्याचे नाव तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे.
या ट्रॉफी अनावरणप्रसंगी जेम्स अँडरसन म्हणाला की, "ही प्रतिष्ठित मालिका सचिन आणि माझ्या नावावर असल्याने माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा मोठा अभिमानाचा क्षण आहे. दोन्ही देशांमधील स्पर्धा नेहमीच खास राहिली आहे."
सचिन तेंडुलकर म्हणाला,"माझ्यासाठी कसोटी क्रिकेट हे जीवनाचे एक प्रतीक आहे. तुम्ही तुमचे सर्वोत्तम देत असता आणि जर काही चूक झाली तर ते तुम्हाला पुन्हा एकत्र येऊन विचारकरण्यासाठी आणखी एक दिवस देते. हा खेळाचा सर्वोच्च प्रकार आहे."
भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असून या मालिकेतील पहिली कसोटी २० जूनपासून लीड्समध्ये खेळवली जाणार आहे. दुसरी कसोटी २ जुलैपासून बर्मिंगहॅम, तिसरी कसोटी १० जुलैपासून लॉर्ड्स, तर चौथी कसोटी २३ जुलैपासून मँचेस्टर, मध्ये पाचवी कसोटी ३१ जुलैपासून लंडनमधील ओव्हल येथे खेळवण्यात येईल.