Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी खेळाडूंची मानसिकता नेमकी कशी? जोशाने भरलेला संघ आला समोर; पहा व्हिडिओ

हेडिंग्ले, लीड्स येथे आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 20, 2025 | 02:31 PM
IND vs ENG: What exactly is the mentality of the players before the first Test match? A team full of passion emerged; Watch the video

IND vs ENG: What exactly is the mentality of the players before the first Test match? A team full of passion emerged; Watch the video

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा पहिला सामना आजपासून सुरू होणार  आहे.  हेडिंग्ले, लीड्स येथे हा सामना खेळवण्यात येणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही एका नवीन युगाची सुरुवात मानली जात आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन सारखे दिग्गजांनी आधीच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिल्यांदाच पूर्ण युवा संघासह सज्ज झाली आहे.

हेही वाचा : ENG vs IND : पहिल्या सामन्यात तिसऱ्या नंबरचा प्रश्न सुटला! BCCI ने व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती

शुभमन गिलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये शुभमन गिलछाया नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तसेच त्याच्यासाठी ही एक ऐतिहासिक संधी देखील असणार आहे. त्याला पहिल्यांदाच कसोटी संघाची कमान सोपवण्यात आली आहे. आज त्याचा कर्णधार म्हणून पदार्पण सामना असेल. तरुण कर्णधारासमोर संघाचे नेतृत्व करण्याचे तसेच वरिष्ठ खेळाडूंची भरपाई भरून काढण्याची जबाबदारी असणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांच्या नजरा गिलच्या रणनीती आणि नेतृत्व कौशल्यावर असणार आहेत.

युवा नवीन चेहरे आणि संघातील संतुलनावर विश्वास

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सामन्यापूर्वी म्हणाला की “हा संघ पूर्णपणे संतुलित आहे आणि सर्व खेळाडू एकमेकांशी समन्वय साधून खेळण्यास सज्ज आहेत.” तसेच तो पुढे म्हणाला की, आम्हाला विश्वास आहे की, तरुण खेळाडू जबाबदारी घेतील आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताची परंपरा पुढे नेतील.”

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुलचा देखील संघात समावेश आहे. जो तरुण खेळाडूंसाठी मार्गदर्शकाची भूमिका वठवू शकतो.  त्याच्या अनुभवामुळे आणि शांत स्वभावामुळे ड्रेसिंग रूम बळकट होण्याची आशा आहे.

We are set for the series opener 👌 👌#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/xAbVDUsUdp — BCCI (@BCCI) June 20, 2025

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अनुभवाचा होणार फायदा

टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडच्या खेळपट्ट्या आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणून आहे. एक खेळाडू म्हणून, त्याने येथे अनेक सामने देखील खेळले आहेत आणि त्याचा अनुभव रणनीती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वेगवान स्विंग आणि सीम हालचालींना तोंड देण्यासाठी गंभीरने खेळाडूंना विशेष अभ्यास करून घेतला आहे.

हेही वाचा : भारताचे सर्वात तरुण कसोटी कर्णधार कोणते? शुभमन गिल कोणत्या स्थानावर? धोनीचाही समावेश

इंग्लिश संघही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार..

इंग्लंड संघ बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. आक्रमक कर्णधारपदासाठी ओळखला जाणारा स्टोक्स भारताला चांगली टक्कर देण्यास सज्ज झाला आहे. इंग्लंडचा संघ घरच्या परिस्थितीत खेळण्याचा नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

Web Title: Ind vs eng what exactly is the mentality of the players before the first test match watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • India vs England
  • Test Match

संबंधित बातम्या

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 
1

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

IND vs SA: प्रशिक्षक गंभीरने आखला चक्रव्युह! ‘या’ अस्त्राच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेची फिरकी भिंत भेदणार 
2

IND vs SA: प्रशिक्षक गंभीरने आखला चक्रव्युह! ‘या’ अस्त्राच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेची फिरकी भिंत भेदणार 

Ashes series 2025: ‘या’ गोलंदाजांनी गाजवली अ‍ॅशेस मालिका! ऐतिहासिक मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण?
3

Ashes series 2025: ‘या’ गोलंदाजांनी गाजवली अ‍ॅशेस मालिका! ऐतिहासिक मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण?

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?
4

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.