IND vs ENG: England will be looking for that level to win the Leeds Test? Now they did something that has shaken Team India..
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिली कसोटी लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या लंचपर्यंत इंग्लंडच्या फलंदाजांनी आपले वर्चस्व गाजवले. दुपारच्या जेवणापर्यंत इंग्लंडने एकही विकेट न गमावता ११७ धावा केल्या होत्या, ज्यामुळे भारतीय गोलंदाजांसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी १८१ धावांची भागीदारी रचली होती. त्यांनंतर पावसामुळे खेळ थोडा वेळ थांबवण्यात आला होता. खेळ पुन्हा सूरु झाला तेव्हा मात्र भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. प्रसिद्ध कृष्णाने जॅक क्रॉली आणि ऑली पोप या दोघांना माघारी पाठवले. या सामन्यात काही असे देखील प्रकार घडले जिथे टिम इंडिया संताप व्यक्त करताना दिसून आली.
दुपारच्या जेवणापूर्वी टाकलेल्या शेवटच्या षटकात मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा फलंदाज जॅक क्रॉली यांच्यातील एका घटनेने मैदानावर वातावरण गरमागरमीचे झाले होते. हा प्रकार केवळ खेळाच्या रणनीतीचा भाग नव्हता, तर त्यामुळे दोन्ही संघांमधील तणावही समोर आला.
पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन दाखवले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यासारख्या वेगवान गोलंदाजांना या आपला दबदबा दाखवत आला नाही. या सत्रात एक देखील विकेट मिळू शकली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी केवळ भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा सामनाच केला नाही तर धावगती देखील वाढवली. पण या शांत आणि एकतर्फी सत्रात शेवटच्या षटकात मात्र गोंधळाचे वातावरण दिसून आले.
मोहम्मद सिराज लंचच्या अगदी आधीचे षटक टाकत होता. भारतीय संघाचा विचार होता की, लंच टाइमपूर्वी एखादे षटक टाकावे, जेणेकरून इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करू शकू. सिराजने हे षटक लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी धावत्या धावपट्टीवर वेगाने धावत शेवटचा चेंडू टाकला. त्यानंतर फलंदाजी करत असलेला जॅक क्रॉली मुद्दाम क्रीजपासून दूर गेला. प्रत्यक्षात त्याने वेळ पूर्ण करण्यासाठी असे केले असावे जेणेकरून भारताला आणखी एक षटक टाकायला जमू नये. तो असे करण्यात यशस्वी देखील झाला. परिणामी टीम इंडियाला आणखी एक षटक टाकता आले नाही.
घडलेल्या प्रकारने भारतीय खेम्यात नाराजी पसरली. आक्रमकता सिराज या कृत्यावर नाखुश दिसला. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि इतर खेळाडूंनीही क्रॉलीच्या या हालचालीवर आपली नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. काही क्षणांसाठी मैदानावर वातावरण गरम झाले होते, ज्यामुळे तो चांगलाच चर्चेचा विषय बनला. तथापि, हे कोणत्याही नियमाबाह्य नव्हते. अनेक वेळा खेळाडू रणनीतीनुसार असे करत असतात. परंतु सोशल मीडियावर भारतीय चाहते या घटनेची टीका करत आहेत आणि इंग्लंडच्या फलंदाजावर बेईमानी केल्याचा आरोपदेखील करताना दिसत आहेत.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.