फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या तिसरा कसोटी सामन्याची दुसरी इनिंग सुरु आहे. भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली त्यानंतर दुसरीकडे पुन्हा एकदा भारताच्या संघाने फलंदाजीमध्ये निराशाजनक कामगिरी करून क्रिकेट प्रेमींना नाराज केले आहे. भारताच्या संघाला विजयासाठी न्यूझीलंडच्या समोर १४६ धावांचे लक्ष्य आहे. परंतु भारताच्या संघाने ७.१ ओव्हरमध्ये पाच विकेट्स गमावले आहेत. यामध्ये भारताच्या महत्वाच्या फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वानखेडे पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने सर्वात आधी स्वतःची विकेट गमावली कॅप्टन रोहितने संघासाठी फक्त ११ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शुभमन गिलचा पत्ता कट झाला. त्याने मागील सामन्यात ९० धावांची महत्वाची खेळी खेळली होती परंतु तो या इनिंगमध्ये ४ चार चेंडू खेळून बाद झाला.
त्यानंतर खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहली या सामन्यात देखील निराशाजनक कामगिरी केली आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताच्या संघाने १० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून ४७ धावा केल्या आहेत. तर अजून टीम इंडियाला १०० धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. विराट कोहलीच्या पुढील चेंडूंमध्ये भारताचा सरफराज खान देखील आऊट झाला. सध्या मैदानावर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा मैदानावर टिकून आहेत.
हेदेखील वाचा – IND vs NZ Match Live Update : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस! किवी संघाची फलंदाजी डगमगली
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे सुरू आहे. भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. भारताने कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली आणि सरफराज खान यांच्या विकेट्स गमावल्या आहेत. ऋषभ पंतसोबत रवींद्र जडेजा क्रीजवर आहे. एजाज पटेलने आतापर्यंत ३ बळी घेतले आहेत.
न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला. भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. दुसऱ्या डावात किवी संघाला लवकर पराभूत करण्याचे काम रवींद्र जडेजाने केले. पहिल्या डावानंतर त्याने दुसऱ्या डावातही आपले पंजे उघडले. तत्पूर्वी, न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात भारताने 263 धावा केल्या होत्या. पहिल्या डावानंतर भारताकडे 28 धावांची आघाडी होती.
13 ओव्हरमध्ये भारताच्या संघाने ५८ धावा केल्या आहेत आणि पाच विकेट्स गमावले आहेत. भारताच्या क्रिकेट प्रेमींना रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या रिषभ पंत एका मजबूत स्थितीमध्ये उभा आहे, त्याने मागील सामन्यांमध्ये सुद्धा चांगली ६० धावांची खेळी खेळली होती.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाशदीप