फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
सरफराज खान-रिषभ पंत : न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या फलंदाजीवर भारताच्या संघाने पाणी फेरल आहे. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे भारताच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागेल अशी स्थिती होती. भारताच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाला ४०२ धावांवर रोखले. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाकडे तिसऱ्या दिनाला पहिल्या इनिंगनंतर न्यूझीलंडकडे ३५६ धावांची आघाडी होती. त्यामुळे भारताचा संघाने ज्याप्रकारे पहिल्या इनिंगमध्ये कामगिरी केली त्यावरून भारताचा संघ विजयी होईल असे म्हणणे ही कठीण होत होते. आता भारताच्या संघाने ५० हुन अधिक धावांची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर भारताचे दोन मजबूत स्तंभ टीम इंडियासाठी कालपासून मैदानावर टिकून आहेत. यामध्ये पहिला म्हणजेच सरफराज खान आणि दुसरा म्हणजेच रिषभ पंत.
End of a remarkable knock! Sarfaraz Khan departs after scoring a brilliant 150(195) when the going got tough 👏👏#TeamIndia 408/4, lead by 52 runs Live – https://t.co/FS97Llv5uq
#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/WcPWDTfVfH — BCCI (@BCCI) October 19, 2024
भारताचा युवा फलंदाज सरफराज खानने त्याचे शतक आज पहिल्या सेक्शनमध्ये पूर्ण केले आहे. तर आता त्याने १५० धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. सरफराज खानने १९५ चेंडूंमध्ये १५० धावा केल्या. त्यानंतर त्याचा विकेट गमावला आहे. टीम साऊदीने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने ८४.१ षटकात ४ गडी गमावून ४०८ धावा केल्या आहेत. तर भारताचा अनुभवी फलंदाज रिषभ पंतने त्याच्या मोठ्या अपघातानंतर आणि झालेल्या दुखापतीनंतर त्याने बांग्लादेशविरुद्ध पहिले शतक नावावर केले होते. त्यानंतर आता त्याने न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात सातवे शतक पूर्ण करण्यात ११ धावा दूर आहे.
अजुनपर्यत भारतीय संघाकडे केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे फलंदाज शिल्लक आहेत. सरफराज खान आऊट झाल्यानंतर आता रिषभ पंत साथ देण्यासाठी मैदानात केएल राहुल आला आहे. भारताचा संघ न्यूझीलंडसमोर किती धावांचे आव्हान उभे करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल.