
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतीय महिला संघाचा विश्वचशकामध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना झाला होता तर टीम इंडियाचा पुरुष संघाचा आशिया कपमध्ये तीन वेळा दोन्ही संघ आमनेसामने आले होते. आता परत एकदा भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने खेळताना दिसणार आहेत. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने चांगली कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत केले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी अद्याप टीम इंडियाला आशिया कप २०२५ विजेत्याचा ट्रॉफी सादर केलेला नाही, परंतु नवीन स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे.
एसीसी कतारमधील दोहा येथे रायझिंग स्टार्स आशिया कप २०२५ चे आयोजन करत आहे. ही स्पर्धा १४ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी इंडिया अ संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ लीग टप्प्यात तीन सामने खेळेल.
ICC ने Women’s Cricket World Cup संघाची केली घोषणा, कर्णधार हरमनप्रीत कौरला टीममधून वगळले
१६ नोव्हेंबर रोजी टीम इंडिया पाकिस्तान अ संघाशी खेळेल. त्याआधी टीम इंडिया १४ नोव्हेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळेल. भारताचा शेवटचा लीग स्टेज सामना १८ नोव्हेंबर रोजी ओमानविरुद्ध होईल. बीसीसीआयने जितेश शर्माला आपल्या ज्युनियर संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. जितेश सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाकडून खेळत आहे. तथापि, सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर आहेत. वैभव पाकिस्तानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
बीसीसीआयने घोषणा केलेल्या संघाच्या यादीमध्ये अनेक नवे युवा खेळाडू पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाने कमालीची कामगिरी मागील काही सामन्यामध्ये केली आहे. प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा यांसारखे नवे खेळाडू हे आता भारतीय अ संघामध्ये खेळताना दिसतील.
प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, जितेश शर्मा (कर्णधार) (यष्टीरक्षक), रमणदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, विजय कुमार वैशाख, चारवीर सिंग, युध्दवीर सिंह, पो. सुयश शर्मा.
स्टँडबाय खेळाडू: समीर रिझवी, शेख रशीद, गुरनूर सिंग ब्रार, कुमार कुशाग्रा, तनुष कोटियन
| क्रमांक | तारिख | सामना |
|---|---|---|
| 1 | 14 नोव्हेंबर | यूएई (लीग सामना) |
| 2 | 16 नोव्हेंबर | पाकिस्तान ए (लीग सामना) |
| 3 | 18 नोव्हेंबर | ओमान (लीग सामना) |
| 4 | 21 नोव्हेंबर | सेमीफायनल 1 |
| 5 | 21 नोव्हेंबर | सेमीफायनल 2 |
| 6 | 23 नोव्हेंबर |
फायनल |