
IND vs SA 1st Test: Day 1 in favour of Indian bowlers! Gill Army's score at the end of the day was 37 runs for 1 wicket.
IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. आजया सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला भारतीय गोलंदाजांनी १५९ धावांवर रोखले आहे. जसप्रीत बूमराहने भारताकडून सर्वाधिक ५ बळी टिपले आहे. तर धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर १ बाद ३७ धावा केल्या आहेत. केएल राहुल १३ धावांवर तर वाॅशिग्टन सुंदर ६ धावांवर नाबाद आहे. भारताला यशस्वी जयस्वालच्या रूपात पहिला झटका बसला आहे.
हेही वाचा : IND vs SA 1st Test : Jasprit Bumrah ची ऐतिहासिक कमाल! १७ वर्षांत केला पहिल्यांदाच ‘हा’ कारनामा
खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा भारतीय सलामीवीर लोकेश राहुल १३ धावांसह आणि वॉशिंग्टन सुंदर ६ धावांवर खेळत होते. भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेपेक्षा १२२ धावांनी पिछाडीवर असून भारताच्या ९ विकेट्स बाकी आहेत. भारताने यशस्वी जयस्वालच्या रूपात आपला एकमेव बळी गमावला, जो मार्को जानसेनने १२ धावांवर बाद केला.
कोलकाटा येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. भारतीय गोलंदाजी पुढे दक्षिण आफ्रिकेचा डाव ढासळला आणि ५५ ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिका संघ सर्वबाद १५९ धावायच करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्कराम या एकाच फलंदाजाल सर्वाधिक म्हणजे ३१ धावा करता आल्या. अन्य फलंदाज मैदान्त टिकाव धसरू शकले नाहीत. रायन रिकेल्टन २३, विआन मुल्डर २४, टोनी डी झोर्झी २४, कर्णधार टेम्बा बावुमा ३, काइल व्हेरेन १६, सायमन हार्मर ५, मार्को जानसेन ०, केशव महाराज ०, बोसच ३ धावा करून बाद झाले तर ट्रिस्टन स्टब्स १५ धावांवर नाबडा राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने २७ धावांत ५ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. कुलदीप यादव (३६ धावांत २ बळी) आणि मोहम्मद सिराज (४७ धावांत २ बळी) यांनी चांगली साथ दिली. अक्षर पटेल (२१ धावांत १ बळी).
हेही वाचा : IND vs SA 1st Test : कुलदीप यादवचा मोठा कारनाम! जडेजा-झहीर खानचा विक्रम मोडत क्रिकेटमध्ये रचला इतिहास
भारतीय संघाची प्लेइंग 11
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल, रविंद्र जडेजा, वाॅशिग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,
दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग 11
एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, टोनी डी झोर्झी, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, सेनुरन मुथुसामी, सायमन हार्मर, मार्को जानसेन, केशव महाराज, बोसच