
Ind vs SA 2nd Test: 'That' mistake by KL Rahul and Bumrah speechless! Pant Army had to suffer heavy losses
Ind vs SA 2nd Test : गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसरी कसोटी खेळवण्यात येत आहे. आजपासून सुरू झालेल्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला क्षेत्ररक्षणाचा चांगलाच धक्का बसला आहे. स्टार फलंदाज केएल राहुलने स्लिपमध्ये एक सोपा झेल सोडून आपल्या संघाच्या अडचणीत वाढ केली आहे.
हेही वाचा : AUS vs ENG : उडता Mitchell Starc…एका हाताने एक जबरदस्त झेल! हा फलंदाज संपूर्ण सामन्यात राहिला नाबाद
पहिल्या डावाच्या सातव्या षटकातमध्ये, केएल राहुलने जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर एडेन मार्करामला एक सोपा झेल सोडून जीवनदान दिले. त्यावेळी मार्कराम फक्त ४ धावांवर खेळत होता. या जीवदानाचा फायदा घेत, मार्करामने रायन रिकल्टनसोबत पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचून भारतीय गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला.
केएल राहुलने जर हा झेल घेतला असता, तर भारताला सुरुवातीच्या षटकांमध्ये पहिली विकेट मिळवण्यात यश आले असते. त्यामुळे संघावर असेलला दबाव कमी होण्यास मदत झाली असती. तथापि, सुदैवाने, जसप्रीत बुमराहने २७ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एडन मार्करामला क्लिन बॉलिंग करून भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. मार्कराम ८१ चेंडूत पाच चौकारांसह ३८ धावांवर माघारी परतला.
टी-ब्रेकवर, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर एका विकेटच्या मोबदल्यात ८२ धावा झाला होता. दोन्ही सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला. हा ड्रॉप कॅच भारतासाठी चांगलाच महागडा ठरला, कारण सुरुवातीचा ब्रेकथ्रू मिळविण्यासाठी बराच वेळ लागला, ज्यामुळे भारतीय गोलंदाजांना अधिक मेहनत करणे भाग पडले.
35 years Old Michelle Starc.
33 years Old KL Rahul. pic.twitter.com/qmHyyDDECP — Niroy⁴⁵🐐 (@Niroy45) November 22, 2025
टी-ब्रेकनंतर पहिल्याच षटकात, कुलदीप यादवने भारताला दुसरे यश मिळवून दिले. कुलदीपने रायन रिकेल्टनला ऋषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. दक्षिण आफ्रिकेला ८२ धावांवर दुसरा धक्का बसला. रायन रिकेल्टन ३५ धावांवर माघारी गेला.
८२ धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर, ट्रिस्टन स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी संघाला सावरले आहे. या दोघांनी 68 धावांची भागीदारी रचली आहे. ट्रिस्टन स्टब्स ३२ धावांवर आणि टेम्बा बावुमा ३६ धावांवर खेळत आहेत.