
Ind vs Sa 2nd Test: Marco Janssen's 'six' and India in the throes of defeat! 'That' performance was repeated after 25 years
हेही वाचा : IND VS SA : यशस्वी जयस्वालचा WTC मध्ये महापराक्रम! ‘हा’ विक्रम करत जागतिक क्रिकेटमध्ये रचला इतिहास
मार्को जॅनसेनने यावेळी उत्कृष्ट गोलंदाजीच केली नाही तर पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजीचे देखील प्रदर्शन दाखवले. त्याने ९१ चेंडूचा सामना करत ९३ धावांची जलद खेळी खेळून त्याच्या संघाला मजबूत धावसंख्या उभी करण्यास मोठे योगदान दिले. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने भारतीय भूमीवर कसोटी सामन्यात अर्धशतकासह ५०+ धावा करण्याची किमया साधली आहे. यापूर्वी निकी बोजेने २००० मध्ये हा पराक्रम केला होता. २१ व्या शतकात भारतात हा पराक्रम करणारा जानसेन हा तिसराच परदेशी खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी जानसेन आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर (हैदराबाद, २०१८) यांनी अशी किमया साधली होती.
१९८८ नंतर भारतात कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकणारा जॅन्सन हा तिसराच डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी भारताचा झहीर खान (तीन वेळा) आणि ऑस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सन (२०१०) यांनी अशी कामगिरी बजावली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांची भारतातील सर्वोत्तम कामगिरी
भारताचा पहिला डाव २०१ धावांवर गदगडला आहे. भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ५८ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरनेही ९२ चेंडूत ४८ धावा फटकावल्या. तसेच कुलदीपने १३४ चेंडूत १९ धावा काढल्या. केएल राहुल २२ धावा, साई सुदर्शन १५ धावा, ध्रुव जुरेल ० धावा, ऋषभ पंत ७ धावा, रवींद्र जडेजा ६ धावा, नितीश कुमार रेड्डी १० धावा, कुलदीप यादव १९ धावा, जसप्रीत बुमराह ५ धावा करून बाद झाले तर मोहम्मद सिराज २ धावा करून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जानसेनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या तर सायमन हार्मरने ३ विकेट्स घेतल्या. तर केशव महाराजने १ विकेट्स घेतल्या