दक्षिण आफ्रिकेची गुवाहाटी कसोटी सामन्यावर पकड(फोटो-सोशल मीडिया)
तिसऱ्या दिवसाच्या खेळ थांबलं तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने कोणताही गडी न गमावता २६ धावा केल्या होत्या. एडेन मार्कराम (१२) आणि रायन रिकेल्टन (१३) क्रीजवर नाबाद असून दक्षिण आफ्रिकेने भारतावर ३१४ धावांची मोठी आघाडी घेतली आहे. त्याआधी, भारताचा पहिला डाव २०१ धावांवरच गडगडला. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने भारतावर फॉलोऑन लादला नाही आणि पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताचा पहिला डाव २०१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ५८ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरनेही ९२ चेंडूत ४८ धावा करत भारताला २०० पार पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. तसेच कुलदीपने १३४ चेंडूत १९ धावा करत धिराने उभा राहिला. केएल राहुल २२ धावा, साई सुदर्शन १५ धावा करून बाद झाला. त्याला सायमन हार्मरमने माघारी पाठवले.वॉशिंग्टन सुंदरने ९२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. त्याला सायमन हार्मरने बाद केले. ध्रुव जुरेल ० धावा, ऋषभ पंत ७ धावा, रवींद्र जडेजा ६ धावा, नितीश कुमार रेड्डी १० धावा, कुलदीप यादव १९ धावा, जसप्रीत बुमराह ५ धावा करून बाद झाले तर मोहम्मद सिराज २ धावा करून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जानसेनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या तर सायमन हार्मरने ३ विकेट्स घेतल्या. तर केशव महाराजने १ विकेट्स घेतल्या
हेही वाचा : IND VS SA : यशस्वी जयस्वालचा WTC मध्ये महापराक्रम! ‘हा’ विक्रम करत जागतिक क्रिकेटमध्ये रचला इतिहास
यापूर्वी, बरसापारा क्रिकेट स्टेडियमवरील दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने दोन दिवस फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात सेनुरन मुथुस्वामी (१०९) च्या शतक आणि मार्को जानसेन (९३) च्या अर्धशतकाच्या जोरावर ४८९ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेण्यात यश मिळवले.






