
Women's Cricket World Cup 2025 final creates history; sets new record for number of people watching the match
Women Cricket World Cup 2025 : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ आणि दक्षिण महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. भारताच्या ऐतिहासिक विजयाने देशात क्रिकेट प्रसारणासाठी नवीन विक्रम रचले. अधिकृत प्रसारकानुसार एकूण ४४६ दशलक्ष प्रेक्षकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही स्पर्धा पाहिली आहे. जिओहॉटस्टारने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की १८५ दशलक्ष वापरकर्त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर महिला विश्वचषक अंतिम सामना पाहिला असून ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले.
हेही वाचा : IND A vs SA A : पहिल्या डावात भारतीय संघ रुळावर! गोलंदाजांनी उडवली अफ्रिकेच्या फलदाजांची दाणादाण
विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या प्रेक्षकांची संख्या इंडियन प्रीमियर लीगच्या दैनंदिन सरासरीपेक्षा जास्त दिसून आली. परंतु गेल्या वर्षी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पुरुषांच्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यादरम्यान नोंदवलेल्या प्रेक्षकांच्या संख्येशी याची तुलना करता येते. प्रसारकाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ४४६ दशलक्ष प्रेक्षकांची संख्या महिला क्रिकेटसाठी आतापर्यंतची सर्वाधिक असून मागील तीन महिला विश्वचषकांच्या एकत्रित एकूण संख्येपेक्षा ही खूप जास्त आहे.
हेही वाचा : IPL 2026 : ‘किंग’ कोहलीमुळे RCB ला विकण्याची वेळ? ‘त्या’ अहवालाने उडवली मोठी खळबळ; नेमकं कारण काय?
त्यात असे देखील म्हटले आहे की, “भारतात महिला क्रिकेट प्रेक्षकांच्या वाढीतील हा एक मैलाचा दगड आहे.” प्रसिद्धीपत्रकानुसार पुढे म्हटले आहे की, “महिला विश्वचषक अंतिम सामना २१ दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिला आहे, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरचा संघ महिला विश्वचषक जिंकणारा पहिला आशियाई संघ बनला आहे.” जिओहॉटस्टारने म्हटले आहे की, “आणखी एक विक्रम रचत, ९२ दशलक्ष लोकांनी कनेक्टेड टीव्ही (सीटीव्ही) वर हा ऐतिहासिक सामना पहिला असून जो २०२४ च्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्याच्या सीटीव्ही प्रेक्षकांइतका आहे.”
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. एमसीएकडून महाराष्ट्र सरकारला मुंबई महानगर प्रदेशात निवासी महिला क्रिकेट अकादमी बांधण्यासाठी योग्य जमीन देण्याची विनंती करण्यात आली आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात औपचारिक पत्र देखील सादर केले आहे. भारतीय संघाने नुकताच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद नावावर केल्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आले आहे.