फोटो सौजन्य - BCCI
टीम इंडिया प्लेइंग ११ : भारताचा संघ आजपासून श्रीलंका दौऱ्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे. आज एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. भारताच्या संघाने T२० मालिका सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ३-० असा विजय मिळवला आहे. आता टीम इंडिया आज पुन्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच सामना खेळणार आहे. आजच्या सामन्यामध्ये अनेक खेळाडूंचे संघामध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
आजचा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० मिनिटांनी सुरु होणार आहे, सामना सुरु होण्याच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल.
आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे, कारण आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवलेल्या संघाकडे १-० अशी आघाडी असेल आणि पुढील सामन्यामध्ये त्याचा फायदा होईल. आजच्या सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार याकडे एकदा नजर टाकूया
आजच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल टॉप ऑर्डरमध्ये ओपनिंग करताना दिसू शकतात. तर विराट कोहली आज तिसऱ्या क्रमांकावर आपल्या जुन्या स्थानावर येऊ शकतो. तथापि, कोहली आणि गिल यांच्या पोझिशन्सचीही अदलाबदल होऊ शकते, म्हणजेच कोहली सलामीलाही दिसू शकतो. आता रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करताना दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मधल्या फळीची सुरुवात श्रेयस अय्यरपासून होऊ शकते. यानंतर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर दिसू शकतो. एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलला प्राधान्य दिले जाऊ शकते. यानंतर रियान पराग सहाव्या क्रमांकावर दिसू शकतो. भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रियान पराग वनडेमध्येही पदार्पण करू शकतो. परागने टी-20 मालिकेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी दाखवली.
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रायन पराग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद.