फोटो सौजन्य - बीसीसीआय
आयसीसी महिला विश्वचषक २०२५ आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंकेच्या संघात गुवाहाटी येथील एसीए स्टेडियमवर खेळला जाईल. घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्याचा फायदा उठवण्यासाठी, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून आपले खाते उघडण्याचा प्रयत्न करेल. या स्पर्धेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन होणार आहे. गुवाहाटीमध्ये स्पर्धेच्या आधी भारताची सर्वात मोठी गायिका श्रेया घोषाल कार्यक्रमामध्ये सामील होणार आहे.
आजपासून आरसीसी महिला विश्वचषक 2025 ला सुरुवात होणार आहे या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्या आधी श्रेया घोषाल तिच्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. या आधी तिने भारतीय महिला संघाच्या ड्रेसिंग मध्ये जाऊन सर्व महिला खेळाडूंनची भेट घेतली. ड्रेसिंग रूममध्ये काही महिला खेळाडू तिच्या फॅन्स होत्या यावेळी तिने त्यांच्यासाठी पियू बोले हे गाणे देशील गाऊन दाखवले. बीसीसीआयने श्रेया घोषाल चा हा व्हिडिओ त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवर शेअर केला आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्रेया घोषाल हिने भारतीय संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा देखील दिला त्याचबरोबर टीम इंडिया या विश्वचषकांमध्ये ट्रॉफी जिंकेल अशी घोषणा देखील तिने खेळाडूंसोबत केल्या. या संघाचे ध्येय ४७ वर्षांत पहिले आयसीसी जेतेपद जिंकणे आहे. महिला संघाने स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडवर चार विकेटने विजय मिळवला, तर श्रीलंकेच्या संघाला सराव सामन्यात एका धावेने पराभव पत्करावा लागला. तर, २०२५ च्या महिला विश्वचषकाचा पहिला सामना चाहते कधी, कसा आणि कुठे मोफत पाहू शकतात ते जाणून घेऊया.
Starting our campaign with melodious vibes 🎼🎤🥳 When Shreya Ghoshal visited the #TeamIndia dressing room ❤️ Get your #CWC25 tickets now: https://t.co/vGzkkgwXt4#WomenInBlue | @shreyaghoshal pic.twitter.com/lflKjS4kZm — BCCI Women (@BCCIWomen) September 30, 2025
भारत विरुद्ध श्रीलंका विश्वचषकाचा पहिला सामना हा 30 सप्टेंबर 2025 रोजी खेळवला जाणार आहे हा सामना गुवाहाटी येथील एसीएम स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याला सुरवात दुपारी ३ वाजता होणार आहे त्या सामन्याच्या अर्थाचा आधी २.३० वाजता नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण हेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओ हॉटस्टार वर पाहायला मिळणार आहे.