फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध श्रीलंका : भारताच्या श्रीलंका दौऱ्यामध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये काल पहिला एकदिवसीय सामना पार पडला या सामन्यामध्ये धक्कादायक निकाल समोर आला. भारत विरुद्ध श्रीलंका या तीन सामान्याच्या मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यामध्ये श्रीलंकेचा कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये पहिले फलंदाजी करत ८ विकेट्स गमावून २३० धावांचे लक्ष्य भारतासमोर उभे केले होते. यामध्ये भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले, त्यानंतर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने २ विकेट घेतले आहेत. यामध्ये भारताचे फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर टिकू शकले नाही.
भारताच्या फलंदाजीचा विचार केला तर भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरला होता. भारताचा कर्णधार रोहित शर्माने विश्वचषकानंतर त्याचे पहिले अर्धशतक ठोकले. त्याने ४७ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिल फार जास्त धावांची भागीदारी करू शकला नाही. त्याने ३५ चेंडूंमध्ये फक्त १६ धावा करून बाद झाला. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने ३२ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर ४ चेंडूंमध्ये ५ धावा करून बाद झाला.
श्रेयस अय्यरने टीम इंडियामध्ये बऱ्याच वेळानंतर पुनरागमन केले आहे. त्याने या सामन्यामध्ये २३ चेंडूंमध्ये २३ धावा करून बाद झाला. त्यानंतर भारताचा यष्टीरक्षक केएल राहुलने ४३ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या आहेत. अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी संघासाठी महत्वाची खेळी खेळली. त्यामुळे सामना ड्रॉ पर्यत गेला. भारताचे सुरुवातीचे विकेट्स लवकर गेल्यामुळे भारताच्या संघाने लक्ष्य पार केले परंतु सामना जिंकता आला नाही.
भारताचा पुढील सामना ४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० सुरु होणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.