फोटो सौजन्य - BCCI Women
हरमनप्रीत कौर : भारतीय महिला संघाचा आज सामना श्रीलंकेविरुद्ध पार पडला. भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यामध्ये ट्राय सीरिजचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारताच्या संघाने साखळी सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी केली आणि फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर फायनलच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सर्वाच्च धावसंख्या उभारून श्रीलंकेच्या संघाला घरच्या मैदानावर पराभूत केले. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात कमालीची कामगिरी केली. या सामन्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने त्यांच्या खेळाबद्दल आणि मालिकेबद्दल काय सांगितले यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रविवारी तिच्या वेगवान गोलंदाजांना होणाऱ्या वारंवार होणाऱ्या दुखापतींबद्दल चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सपोर्ट स्टाफ ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्रिकोणी एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९७ धावांनी विजय मिळवल्यानंतर हरमनप्रीतने हे सांगितले.
𝙒𝙞𝙣𝙣𝙚𝙧𝙨 𝙖𝙧𝙚 𝙜𝙧𝙞𝙣𝙣𝙚𝙧𝙨 😁#TeamIndia, the winners of #WomensTriNationSeries2025 🏆
Scorecard ▶️ https://t.co/rVyie6SUw9#INDvSL pic.twitter.com/Ti3rNQopUd
— BCCI Women (@BCCIWomen) May 11, 2025
पुरस्कार सोहळ्यात बोलताना हरमनप्रीत म्हणाली, “मला संपूर्ण संघाचा, विशेषतः फलंदाजांचा अभिमान आहे. आम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. प्रथम फलंदाजी करताना, भारताने ७ बाद ३४२ धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर श्रीलंकेला २४५ धावांत गुंडाळले. उपकर्णधार स्मृती मानधना ही दिवसाची सर्वात मोठी स्टार होती, तिने शानदार शतक झळकावून भारताला चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, अमनजोत कौर आणि हरमनप्रीत यांच्यासारख्या उपयुक्त खेळी झाल्या.
प्रीती झिंटाने तिच्या चाहत्यांची माफी का मागितली? सोशल मीडियावर व्हायरल झाली पोस्ट
हरमनप्रीत म्हणाली, “आम्ही कधीही सुधारणा थांबवू शकत नाही. असे अनेक विभाग आहेत जिथे आम्ही चांगली कामगिरी करू शकतो, मग ते फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. आमचे वेगवान गोलंदाज जखमी होत राहतात. ही अशी गोष्ट आहे जी आम्हाला काळजी घ्यावी लागेल. प्रशिक्षक त्यावर काम करत आहेत.”
हरमनप्रीत पुढे म्हणाली की, “स्मृती आणि माझ्याशिवाय इतर फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती खूप सकारात्मक होती. आजच्या सामन्यांमध्ये ज्याप्रकारे स्नेह राणा हिने संघासाठी गोलंदाजी केली ती खूप चांगली आणि साकात्मक होती. बोलण्यासारख्या अनेक सकारात्मक बाबी आहेत पण सध्या मला या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.” १५ विकेट्स घेतल्याबद्दल स्नेहला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले, तर मंधानाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.