फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध श्रीलंका : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याच्या मालिकेचा आज श्रीगणेशा होणार आहे. यामध्ये भारताच्या संघाचे नेतृत्व कर्णधार रोहित शर्मा करत आहे. त्याचबरोबर भारताचा नवा कोच गौतम गंभीर सुद्धा सामन्यामध्ये टीम इंडियासोबत असणार आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली हे विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये खेळताना दिसणार आहेत. यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बऱ्याच महिन्यानंतर भारतीय संघामध्ये केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजर असणार आहेत. केएल राहुलला संघामध्ये स्थान दिल्यामुळे रिषभ पंतला संघामधून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरला सुद्धा प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही. या मालिकेमध्ये तीन सामने खेळवले जाणार आहेत. यामधील आज पहिला सामना सुरु झाला आहे. तर दुसरा सामना ४ ऑगस्ट रोजी खेळवण्यात येईल आणि तिसरा सामना ७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
आजच्या सामन्यामध्ये सलामी देण्यासाठी रोहित शर्माच्या जोडीला शुभमन गिल येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या स्थानावर येईल. त्याचबरोबर उपकर्णधार शुभमन गिलला करण्यात आले आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज
पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानगे, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेलालेज, अकिला धनंजय, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज