
Ind vs Wi 2nd Test: 'Yorker King' will play in Delhi Test? How is the playing eleven of Indian team against West Indies..
Ind vs Wi 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिलं सामना अहमदाबाद येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला एक डाव आणि १४० धावांनी पराभूत करून मालिकेत १-१ अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर शुक्रवारपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता या सामन्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाबद्दल आता जास्त अंदाज बांधले जात असून भारतीय संघाचा अंतिम ११ संघ कसा असणार याबाबट तर्क लावताना दिसत आहेत. जसप्रीत बुमराहला या कसोटीट विश्रांती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : ताजी ICC Test Rankings जाहीर! टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाला फटका! जोचे अव्वल ‘रूट’ कायम
आशिया कपचे जेतेपद जिंकल्यानंतर केवळ तीन दिवसांनी जसप्रीत बुमराहला मैदानात उतरवण्यात आले होते. तेव्हा अनेकजण अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. त्यांना आश्चर्य वाटले की हे कोणत्या प्रकारचे वर्कलोड व्यवस्थापन करण्यात आले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहने पूर्णपणे सहजतेने गोलंदाजी केली. आता, दोन कारणांमुळे बुमराहला विश्रांती देण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. यातील पहिले कारण म्हणजे , बुमराहचे वर्कलोड मॅनेजमेंट ही आहे, तर दुसरे कोटलाच्या खेळपट्टीची काळी माती, जिथे फिरकीपटू तुलनेने लवकर मैदानात उतरवले जाते आणि वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला जास्त वेळ खेळण्याची आवश्यकता भासत नाही. तथापि, पहिली कसोटी फक्त तीन दिवसांतच संपली, त्यामुळे बुमराहला खेळवण्याचा मोह आहे. एकंदरीत, वेगवान गोलंदाजाला विश्रांतीमिळण्याची शक्यता आहे.
डावखुरा फलंदाज पडिक्कल काही चांगल्या खेळींसह प्रसिद्धीझोतात आला.त्यानंतर त्याने अलीकडेच टीम इंडियामध्ये स्थान देखील मिळवले आहे, परंतु, पडिक्कल दिल्लीमध्ये त्याचा तिसरा कसोटी सामना खेळण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे. जर मागील सामन्यातील एकाही फलंदाजाला दुखापत झाली नसली वा भारतीय व्यवस्थापनाने कोणतेही मोठे प्रयोग करण्यात आले नाहीत तर देवदत्तला बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. एकूणच, दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेवन खालीलप्रमाणे असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ICC Ranking : मिया मॅजिकची आता ICC ला भुरळ! कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजने गाठली मोठी ऊंची
शुभमन गिल (कर्णधार) , यशस्वी जैस्वाल,केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) ,रवींद्र जडेजा , नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बूमराह, प्रसिद्ध कृष्णा