मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
ICC Test rankings : आयसीसीने ताजी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत मिया मॅजिक चालल्याचे दिसून आल्याचे दिसले तर यॉर्कर किंगचा जलवा कायम असल्याचे दिसून आले आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपला दबदबा राखला आहे. तो अव्वल क्रमांकाचा गोलंदाज म्हणून अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर त्याचा संघ सहकारी मोहम्मद सिराजने देखील त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवण्यात यश मिळवले आहे. जरी सिराजने अद्याप टॉप १० मध्ये प्रवेश केलेला नसला तरी, तो ज्या तीव्रतेने प्रगती करत आहे त्यावरून असे दिसून येते की तो लवकरच तो १० मध्ये येण्यावाचून राहणार नाही.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार, भारताचा जसप्रीत बुमराह ८८५ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तो ९०८ गुणांवर पोहोचला आहे. जे त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग ठरले आहे. रेटिंगमध्ये थोडी घसरणा झाली असली तरी त्याचे पहिले स्थान अधिक मजबूत आहे. त्याच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा ८५१ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. याचा अर्थ दोन्ही खेळाडूंमध्ये अजूनही ३४ गुणांचे बाकी अंतर आहे. सध्या, आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या १० मध्ये बुमराह हा एकमेव भारतीय गोलंदाज सामील आहे.
या क्रमवारीत मोहम्मद सिराजने चनगलीच झेप घेतली आहे. तो तीन स्थानांनी पुढे जाऊन १२ व्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. त्याचे ७१८ गुणांचे नवीन रेटिंग हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग ठरले आहे. त्याने यापूर्वी कधीही इतके उच्च रेटिंग गाठले नव्हते. गेल्या काही महिन्यांत सिराजने सातत्याने चमकदार कामगिरी केली असून विशेषतः नवीन चेंडूने, टीम इंडियासाठी महत्त्वाच्या विकेट्स देखील घेतल्या आहेत.
अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजीकह प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावात त्याने १४ षटकांत ४० धावा देत ४ बळी टिपण्यात यश मिळवले. त्याच्या गोलंदाजीत वेग, स्विंग आणि नियंत्रणाचे परिपूर्ण मिश्रण असल्याचे दिसून आले. दुसऱ्या डावात, सिराजने ११ षटकांत ३१ धावा दिल्या परंतु त्याला बळी मिळवण्यात यश आले नाही.
हेही वाचा : IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर १० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीवर असणार आहे. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत आधीच आघाडी घेतली आहे, परंतु आता लक्ष सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीवर असणार आहे.