
IND vs WI 3rd ODI Live Toss Update
भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करण्यात आला आहे. अंशुल कंबोज या सामन्यातून भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहे. दुखापतग्रस्त प्रसिद्ध कृष्णाच्या जागी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात कंबोजचा समावेश करण्यात आला होता. आता त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. गिलने सांगितले की, नितीश कुमार रेड्डी आणि मोहम्मद सिराज हे देखील या सामन्यात खेळत आहेत.
IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा खोळंबा? चंदीगडमध्ये कसे असेल हवामान, पाहा Weather Report
भारतीय एकदिवसीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. भारतीय संघाने सुरुवातीच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. ही मालिकी आगामी २०२७ च्या वर्ल्ड कपसाठीची तयारी मानली जात आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यात टीम इंडियाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही शानदार शतक ठोकले आहे. तसेच, कर्णधार शुभमन गिलनेही द्विशतक झळकावले आहे. परंतु केएल राहुल, नमन धीर आणि जडेजा यांनी अद्याप फलंदाजी केलेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताची मधल्या फळीतील फलंदाजाच्या कामगिरीवर देखील लक्ष असणार आहे.
गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताला मधल्या षटकांमध्येही विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कुलदीप यादवला इतर गोलंदाजांकडून फारशी साथ मिळत नसल्याचे पाहायला मिळाले. जडेजासारख्या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याने गेल्या आठ सामन्यांमध्ये केवळ तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे, अनुभवी रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.
भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अंशुल कंबोज, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार.
वेस्ट इंडिज : जॉन कॅम्पबेल, ज्युएल अँड्र्यू, शाई होप, अमीर जांगू, शेरफेन रदरफोर्ड, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, विटाले लावेस