IND vs WI : भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडल रवाना झाला आहे. 20 जूनपासून कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून २०२५ च्या आंतरराष्ट्रीय देशांतर्गत हंगामाच्या आणि दक्षिण आफ्रिका अ संघाच्या भारत दौऱ्याच्या वेळापत्रकात काही महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले आहे. पुरुषांचा वरिष्ठ संघ या हंगामात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेचा पहिला सामना २ ऑक्टोबर २०२५ रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, मालिकेतील दुसरा कसोटी सामना, जो पूर्वी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे आयोजित करण्यात आला होता, तो आता नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिजनंतर, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार होता. जो आता कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये खेळला जाई. ल
हेही वाचा : ENG vs IND : प्रॅक्टीस सेशनमध्ये रिषभ पंत जखमी! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
महिला संघाच्या सामन्यांच्या ठिकाणात बदल..
बीसीसीआयकडून महिला संघाच्या सामन्यांच्या ठिकाणात देखील बदल करण्यात आला आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममधील आउटफिल्ड आणि खेळपट्ट्यांच्या नूतनीकरणामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला संघाची एकदिवसीय मालिका चेन्नईहून न्यू चंदीगड येथे हलवण्यात आली आहे. आता मालिकेतील पहिले दोन सामने हे न्यू चंदीगड येथील न्यू पीसीए स्टेडियमवर खेळवले जणार आहेत. तर शेवटचा एकदिवसीय सामना हा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जणार आहे.
दक्षिण आफ्रिका अ संघ ३० ऑक्टोबर २०२५ पासून भारताच्या दौऱ्यावर येणारा आहे आणि भारत अ संघाविरुद्ध दोन बहु-दिवसीय आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार बहु-दिवसीय सामने बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होणार आहेत, तर एकदिवसीय सामने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरून सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे खेळवणार आहेत.
हेही वाचा : ENG vs IND : प्रॅक्टीस सेशनमध्ये रिषभ पंत जखमी! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध भारत अ – बहु-दिवसीय सामन्यांचे वेळापत्रक
तारीख (पासून) तारीख (पर्यंत) दिवस सामना वेळ ठिकाण
३० ऑक्टोबर २०२५ २ नोव्हेंबर २०२५ गुरुवार – रविवार पहिला बहु-दिवस सकाळी ९:३० वाजता बीसीसीआय सीओई, बेंगळुरू
६ नोव्हेंबर २०२५ ९ नोव्हेंबर २०२५ गुरुवार – रविवार दुसरा बहु-दिवस सकाळी ९:३० वाजता बीसीसीआय सीओई, बेंगळुरू
दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध भारत अ – एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक