फोटो सौजन्य - BCCI
शुभमन गिलचे शतक : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या इंनिगमध्ये 518 धावा करुन डाव घोषित केला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे दुसरे शतक भारताचा कर्णधार शुभमन गिल याने झळकावले आहेत. त्याने दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने भारतीय संघासाठी 129 धावांची नाबाद खेळी खेळली.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यावरही टीम इंडियाने आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राच्या अखेरीस टीम इंडियाचा धावसंख्या ४०० च्या पुढे गेली होती आणि कर्णधार शुभमन गिलनेही अर्धशतक झळकावले होते. दुसऱ्या दिवशी, शुभमन गिलने कर्णधार म्हणून एक विशेष कामगिरी केली आणि रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीला मागे टाकले.
Attack mode 🔛 💪 Captain Shubman Gill and Nitish Kumar brought the fireworks in a 91-run stand 🤝#TeamIndia have crossed 4️⃣0️⃣0️⃣ Updates ▶ https://t.co/GYLslRzj4G#INDvWI | @IDFCFIRSTBank | @ShubmanGill | @NKReddy07 pic.twitter.com/Qmo5NnZhbf — BCCI (@BCCI) October 11, 2025
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळत असलेली ही दुसरी कसोटी मालिका आहे. यापूर्वी, गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत गिलची कामगिरी उत्कृष्ट होती आणि तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही होता. या इंग्लंड मालिकेत गिलने ७५४ धावा केल्या. आता, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, शुभमन गिल आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी १००० धावा करणारा १२ वा कर्णधार बनला आहे.
शुभमन गिलने भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांच्यापेक्षा जलद १००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित शर्माने २० डावांमध्ये कर्णधार म्हणून १००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या, तर सौरव गांगुलीने २२ डावांमध्ये. आता, शुभमन गिलने १७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याचा विक्रम भारतीय कर्णधार सुनील गावस्कर आणि विराट कोहली यांच्या नावावर आहे, ज्यांनी प्रत्येकी १५ डावात हा विक्रम केला. शिवाय, कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, ज्यांनी १२,८८३ धावा केल्या आहेत.