Ind vs WI: Bat slips out of hand as soon as ball hits, KL Rahul gets injured; Watch VIDEO
India vs West Indies 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दूसरा कसोटी सामाना खेळला जात आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात उल्लेखनीय पुनरागमन केले, दुसऱ्या डावात वेस्ट इंडिज संघाने ३९० धावा केल्या आणि भारतासमोर १२१ धावांचे लक्ष्य ठेवले. धावसंख्या मोठी नसली तरी, भारतीय संघाची सुरुवात विशेष प्रभावी राहली नाही. सलामीवीर यशस्वी जयस्वाल झटपट बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात केएल राहुलला दुखापत झाली असून त्याला खुप वेदना झाल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
हेही वाचा : IND vs WI 2nd Test : चौथ्या दिवसाचा खेळ संपला! भारत विजयापासून 58 धावा दूर; वेस्ट इंडिजला देणार क्लीन स्वीप?
भारताच्या दुसऱ्या डावात एका क्षणी प्रेक्षक चिंतेत दिसून आले. क्रीजवर असलेला केएल राहुलला फलंदाजी करताना दुखापत झाली. जेडेन सील्सच्या ओव्हरचा तिसरा चेंडू त्याच्या शरीराच्या एका संवेदनशील भागावर जाऊन आदळला. राहुल वेदनेने ओरडला आणि मैदानावरच खाली बसला. त्याच्या वेदना पाहून सहकारी आणि चाहते सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यावेळी संघाचे फिजिओ तात्काळ मैदानावर आले आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले. काही उपचारांनंतर, राहुल पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज झाला, ज्यामुळे प्रेक्षकांना मोठा दिलासा मिळाला.
KL Rahul Is In A Lot Of Pain The Ball Hit Him Hard And He’s On The Ground Hope He’s Fine 🥲pic.twitter.com/1e9ByjU2xn — 𝐀•ᴷᴸ ᴿᵃʰᵘˡ ˢᵗᵃⁿ (@123Centurion__) October 13, 2025
दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालची बॅट चालू शकली नाही. तो फक्त ८ धावा काढून माघारी परतला. यावेळी टीम इंडियाला विजयासाठी आता शेवटच्या दिवशी केवळ ५८ धावांची आवश्यकता आहे.
वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाबद्दल सांगायचे झाले तर, कॅरेबियन फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा प्रतिकार केला.जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध दधाडसाने फलंदाजी केली. कॅम्पबेलने १९९ चेंडूत ११५ धावा केल्या. या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकार मारले. दरम्यान, अनुभवी फलंदाज शाई होपने देखील १०३ धावा करत शानदार शतक झळकवले. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार आणि २ षटकार मारले. या दोन्ही फलंदाजांनी संघाला मजबूत स्थितीत पोहचवले.
हेही वाचा : IND vs WI : शाई होपने शतक ठोकले खरे, पण लाजिरवाणा विक्रम पडला झोळीत; वाचा नेमकं काय घडलं..
तसेच जस्टिन ग्रीव्हजने देखील ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. ज्यामुळे वेस्ट इंडिजला ३९० धावा उभ्या करता आल्या. पहिल्या डावात संघ फक्त २४८ धावांवर गारद झाला होता. परंतु दुसऱ्या डावात त्यांनी जोरदार पुनरागमन करून दाखवले.