IND Vs ZIM : Overconfident भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात विजय, पण झिम्बॉब्वेने आरसा दाखवला, सौजन्य : एक्स
IND Vs ZIM : रायपूरच्या वीर शहिद नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम येथे पार पडलेल्या तीन सामनांच्या मालिकेतील पहिल्या अटीतटीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत येथे झिम्बॉब्वेचा 4 विकेट्सने पराभव केला.
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर केलीस एनधलोवू (42) व शेरेन मेयर्स (नाबाद 43) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर झिम्बॉब्वेने भारतासमोर 5 बाद 115 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताला प्लेऑफमध्येच 4 महत्त्वाचे धक्के बसले. एकप्रकारे भारताला अतिआत्मविश्वाचा (Overconfident) सुरुवातीला तोटा सहन करावा लागला. दरम्यान, दीप्ती शर्मा व निकी प्रसादने सावरून खेळत भारताला कसा बसा विजय मिळवून दिला.
भारताला रायपूरच्या स्टेडियममध्येच मालिकेत सर्व टी-20 सामने खेळायचे आहेत. येथे भारतीय महिला संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असल्याने त्यांना पहिल्या सामन्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. टॉस जिंकून स्मृती मंधानाने क्षेत्ररक्षण घेतले खरे, पण झिम्बॉब्वेने संपूर्ण 20 ओव्हर्स खेळून काढत भारतीय गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.
यावेळी भारताचे क्षेत्ररक्षणही खराब असे पाहण्यास मिळाले. त्याचा केलीस व मेयर्सने पुरेपूर फायदा घेतला. झिम्बॉब्वेचा पहिला विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये पडला, पण दुसऱ्या विकेटसाठी भारताला 10 व्या ओव्हर्सची वाट पहावी लागली. या काळात केलीस व मॉडेस्टर मुपाचिक्वा (16) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी रचली.
त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या मेयर्सने केलीसला चांगली साथ देत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र अरुंधती रेड्डीने केलीसला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. केलीसने 6 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. दुसरीकडे, झिम्बॉव्बेची मधली फळी मेयर्सला साथ देऊ शकली नाही.
मेयर्सने मात्र खराब चेंडू सिमारेषे बाहेर पाठवण्याची आपली कामगिरी कायम राखली होती. अखेरच्या चेंडूपर्यंत आपला विकेट टिकून ठेवत तिने 4 चौकार व 2 षटकारच्या मदतीने नाबाद 43 धावा केल्या. भारताच्या वतीने नंदिनी शर्माने 11 धावा देत 2 विकेट घेतल्या.
IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान
झिम्बॉब्वेच्या तुल्यबळ 115 धावांकडे पाहता, या काय झटपट करून ड्रेसिंग रुममध्ये जाऊ, हा अतिआत्मविश्वास भारताच्या पहिल्या फळीतील फलंदाजांना नडला. दस्तुरखुद्द संघाची नवी कर्णधार स्मृती मंधाना (2 चौकार, 9 धावा) दुसऱ्याच षटकात झिम्बॉब्वेच्या गोलंदाजाच्या गळाला लागली. हेही नसे थोडुके की, काय याच षटकात तिसऱ्या क्रमांकावर आलेली अनुष्का शर्मा (1 चौकार, 4 धावा)ही सोप्पा झेल देत माघारी फिरली.
दुसऱ्याच षटकात नायसा ग्वांझुराने भारताच्या पहिल्या फळीतील महत्त्वाचे हिरे टिपले होते. त्यानंतर माजी कर्णधार हरमनप्रीत कौर एकप्रकारे खेळपट्टीच्या पाया पडायला आल्यागत फक्त 1 धावा करून मिशेल मावुंगाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली.
आता सर्वांच्या आशा आयसीसीच्या प्लेअर ऑफ द मंथ असलेल्या शेफाली वर्मा (4)वर टिकून होत्या. नायसाने आपल्याच गोलंदाजीवर तिचा सुंदर झेल टिपत, डावातील आपला तिसरा विकेट मिळवला. अशाप्रकारे भारताच्या स्कोर बोर्डची अवस्था ही 4 बाद 19 धावा अशी झाली.
IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?
पहिल्या फळीतील महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर आपसुकच त्याचा दबाव हा मधल्या फळीवर आला. तरी देखील निकी प्रसाद व अष्टपैलू दीप्ति शर्माने 82 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. एवढच नाही, तर दीप्तिने 8 चौकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. तर निकीने 6 चौकारांसह नाबाद 39 धावा करत दीप्तिला चांगली साथ दिली. दरम्यान, या सामन्यातील झिम्बॉब्वेच्या गोलंदाजीचे कौतुकच करावे लागेल.






