Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs NZ W : भारताविरुद्ध न्यूझीलंडसमोर DLS पद्धतीनुसार 325 धावांचे लक्ष्य; रावल-मानधनाचा शतकी तडाखा 

आज महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघाने न्यूझीलंड विरुद्ध ३४० धावा काढल्या आहेत, पावसामुळे आता डीएलएस पद्धतीनुसार न्यूझीलंडसमोर ४४ ओव्हरमध्ये ३२५ लक्ष्य देण्यात आले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 23, 2025 | 08:50 PM
IND W vs NZ W: India face a target of 325 runs against New Zealand as per DLS method; Rawal-Manadhan hit centuries

IND W vs NZ W: India face a target of 325 runs against New Zealand as per DLS method; Rawal-Manadhan hit centuries

Follow Us
Close
Follow Us:

IND W vs NZ W, Women’s World Cup 2025 : आज महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ आमनेसामने आला आहे. हा सामना  नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. पावसामुळे एक ओव्हर कमी करण्यात आली आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने ४९ ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावून प्रतिका रावल आणि स्मृती  मानधना या भारतीय सलामी जोडीच्या शतकांच्या जोरावर भारताने ३४० धावांचा डोंगर उभा केल आहे. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी  डीएलएस पद्धतीनुसार  ४४ ओव्हरमध्ये ३२५ लक्ष्य देण्यात आले आहे. न्यूझीलंडकडून रोझमेरी मायरने शानदार गोलंदाजी करत १ विकेट घेतली.

हेही वाचा : Women’s World Cup मध्ये स्मृती मानधनाचा करिश्मा! न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार शतक ठोकताच अनेक विक्रम केले नावावर

न्यूझीलंडची कर्णधार  सोफी डेव्हाईन नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय महिला संघाला फलंदाजीला आमंत्रित केले. सोफी डेव्हाईनचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. कारण भारतीय सलामी जोडी प्रतिका रावल आणि स्मृती  मानधना या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि पहिल्या विकेट्ससाठी ३३.२ ओव्हरमध्ये २१२ धावांची भक्कम भागीदारी रचली. या दरम्यान स्मृती मानधनाने ९५ चेंडूत १०९ धावांची धमकेदार खेळी केली. ज्यामध्ये तिने १० चौकार आणि ४ षटकार लगावले आहेत. तिला सुझी बेट्सने बाद केले. मानधनानंतर प्रतिकाने  मैदानात आलेल्या जेमिमा रॉड्रिग्सच्या सोबत ७६ धावांची भागीदारी रचली. या दरम्यान प्रतीकाने आपले शतक पूर्ण केले. तिने १३४ चेंडूत १२२ धावा केल्या. यामध्ये तिने १३ चौकार आणि २ षटकार लगावले. प्रतिकाला १२२ धावांवर अमेलिया केरने बाद केले.

प्रतिका बाद झाल्यावर जेमिमा रॉड्रिग्सने आक्रमक पवित्रा घेत शानदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. प्रतिकानंतर मैदानात आलेली कर्णधार हरमनप्रीत कौर १० धावा काढून रोझमेरी मायरची शिकार ठरली. त्यानंतर रीचा  घोष नाबाद ४ आणि जेमिमा रॉड्रिग्स नाबाद ७६ धावा(११ चौकार) करून भारताला ३४० यापर्यंत पोहचवले. न्यूझीलंडकडून अमेलिया केर,सुझी बेट्स आणि रोझमेरी मायर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला आहे.

 पावसामुळे दुसरा डाव ४४ ओव्हर्सपर्यंत कमी.. ,

भारताच्या डावावेळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेळ काही वेळ थांबवावा लागल्याने भारताच्या डावातील एक ओव्हर कमी  करून ४९ ओव्हरचा डाव करण्यात आला. आता पावसामुळे न्यूझीलंडच्या डावातील ६ ओव्हर कमी करून त्यांचा डाव ४४ ओव्हरचा करण्यात आला असून डीएलएसनुसार न्यूझीलंडसमोर ४४ ओव्हरमध्ये ३२५ लक्ष्य देण्यात आले आहे.

हेही वाचा : IND W vs NZ W : मानधना-रावलच्या स्फोटक खेळीने रोहित-गिल जोडीला धोबी पछाड; ‘या’ दिग्गजांचा विश्वविक्रम धोक्यात

झीलंड महिला संघ संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), जेस केर, रोझमेरी मायर, ब्री एलिंग, एडन कार्सन, ली ताहुहू, हन्ना रो, पॉली इंग्लिस आणि बेला जेम्स.

भारतीय महिला संघ: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, अरविंद रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि युवती.

Web Title: Ind w vs nz w new zealand set a target of 325 in 44 overs according to dls method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

लग्न रद्द झाल्यानंतर स्मृती मानधनाने बदलला तिचा माईंडसेट! म्हणाली – ‘मी कितीही तुटलेली असले तरीही…’ पहिल्यांदाच बोलली स्पष्ट
1

लग्न रद्द झाल्यानंतर स्मृती मानधनाने बदलला तिचा माईंडसेट! म्हणाली – ‘मी कितीही तुटलेली असले तरीही…’ पहिल्यांदाच बोलली स्पष्ट

लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच दिसली Smriti Mandhana, म्हणाली – जर मला काही आवडत असेल तर…
2

लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच दिसली Smriti Mandhana, म्हणाली – जर मला काही आवडत असेल तर…

लग्न मोडल्यानंतर Smriti Mandhana पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर…; दिल्ली विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल 
3

लग्न मोडल्यानंतर Smriti Mandhana पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर…; दिल्ली विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल 

IND W vs SL W:  श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा! विश्वचषकातनंतर महिला खेळाडू पहिल्यांदाच उतरणार मैदानात 
4

IND W vs SL W:  श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा! विश्वचषकातनंतर महिला खेळाडू पहिल्यांदाच उतरणार मैदानात 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.