
BCCI Announce India Women Squad Against Sa
बीसीसीआयच्या महिला निवड समितीने तिन्ही फॉरमॅटसाठी स्वतंत्र संघ निवडले आहेत. कर्णधार स्मृती मंधाना व्यतिरिक्त, शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स आणि हरलीन देओल यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंचा कसोटी आणि एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. रिचा घोष आणि यास्तिका भाटिया विकेटकीपरची जबाबदारी सांभाळतील. तर, दीप्ती शर्माला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. स्नेह राणा, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा, जिंतिमणी कलिता आणि सायली सातघरे यांचाही कसोटी आणि एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.
स्मृती मंधाना टी२० संघाची कर्णधार असेल, तर शफाली वर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निकी प्रसाद, जी कमलिनी आणि अनुष्का शर्मा यांसारख्या खेळाडूंनाही या संघात संधी देण्यात आली आहे. याशिवाय, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांचाही टी२० संघात समावेश आहे. गोलंदाजीमध्ये श्री चरणी, प्रेमा रावत, क्रांती गौड, नंदनी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी आणि सायली सातघरे यांचा समावेश आहे. दरम्यान, अमनजोत कौरनेही संघात आपले स्थान पक्के केले आहे.
भारताचा कसोटी संघ : स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, प्रतिक रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), श्री चरणी, स्नेह राणा, क्रांति गौड, नंदनी शर्मा, जिंतीमानी कलिता, सायाली सतघरे.
भारताचा एकदिवसीय संघ: स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, प्रतीक रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, ऋचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा (व्हीसी), श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांति गौड, नंदनी शर्मा, जिंतीमानी कलिता, सायाली सातघरे.
भारताचा T20I संघ: स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, रिचा घोष (WK), जी. कमलिनी (डब्ल्यूके), अनुष्का शर्मा, दीप्ती शर्मा,श्री चरणी, प्रेमा रावत, अमनजोत कौर, क्रांति गौड, नंदनी शर्मा, रेणुका सिंह ठाकुर, अरुंधति रेड्डी, सायाली सातघरे.