
IND W vs SA W Final Match Live: Smriti Mandhana makes history in the title match! 'Ya' gave Dhobi a tough defeat to the former captain
IND W vs SA W Final Match 2025 : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील अंतिम सामन्याचा थरार नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे सुरू आहे. या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिके महिला संघ आमनेसामने आहेत. पावसामुळे सामना सुमारे दोन तास विलंबाने सुरू झाला. परंतु खेळ सुरू होताच, संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने भारतीय चाहत्यांना मोठा आनंद दिला. तिने मैदानात उतरताच एक मोठा इतिहास रचला आहे.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी मैदानात आमंत्रित केले. भारतीय सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी डावाची सुरुवात केली. स्मृती आणि वर्माने पहिल्या विकेट्ससाठी १०४ धावांची भागीदारी केली. या दरम्यान स्मृतीने २१ वी धाव पूर्ण करताच भारतीय क्रिकेट दिग्गज मिताली राजचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
हेही वाचा : IND-A vs SA-A: भारतापुढे दक्षिण आफ्रिकाची शरणागती! कर्णधार ऋषभ पंतची विजयी फटकेबाजी
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये स्मृती मानधनाचा शानदार कामगिरी करत आहे. २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात तिने आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. ज्यामुळे एका एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला खेळाडूने सर्वाधिक धावा केल्याचा नवा विक्रम तिने प्रस्थापित झाला आहे.
यापूर्वी, हा विक्रम भारताची माजी कर्णधार मिताली राजच्या नावावर जमा होता, तिने २०१७ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात ४०९ धावा केल्या होत्या. मानधनाने आता यावेळी ४१६ पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट इतिहासात तिचे एक विशेष स्थान तिने निर्माण केले आहे. स्मृतीने संपूर्ण स्पर्धेत अनेक वेळा भारतीय संघाला दमदार सुरुवात करून देण्यात मोठी भूमिका बाजावली आहे. शफाली वर्मासोबत तिने पहिल्या विकेट्ससाठी १०४ धावांची सलामीची भागीदारी करून संघासाठी मोठे योगदान दिले आहे. स्मृती ५८ चेंडूत ४५ धावा करून माघारी गेली. त्यानंतर शेफाली वर्मादेखील ७८ चेंडूत ८७ धावा करून बाद झाली.
हेही वाचा : IND vs AUS 3rd T20 : होबार्टमध्ये भारताचा ‘सुंदर’ विजय; ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका १-१ अशी बरोबरीत