Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND19 vs PAK19: सरफराज अहमदकडून चालू सामन्यात चिटिंग! डगआउटमध्ये बसुन खुलेआम वापरला फोन; पडली वादाची ठिणगी  

२०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत काल क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५८ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानचा मार्गदर्शक सरफराज अहमदने मोबाइल वापरला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 02, 2026 | 04:54 PM
IND19 vs PAK19: Sarfaraz Ahmed caught cheating in the ongoing match! He openly used his phone while sitting in the dugout; a controversy has erupted.

IND19 vs PAK19: Sarfaraz Ahmed caught cheating in the ongoing match! He openly used his phone while sitting in the dugout; a controversy has erupted.

Follow Us
Close
Follow Us:

Sarfaraz Ahmed is using a mobile phone:  २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना काल क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ५८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान पाकिस्तान अंडर १९ मार्गदर्शक सरफराज अहमद डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरताना दिसून आला. त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. ऑनलाइन फिरणाऱ्या स्क्रीनशॉट आणि क्लिप्समध्ये सरफराज खेळाडूंच्या परिसरात बसून मोबाईल फोनकडे पाहत असल्याचे दिसत आहे. हे फोटो मोठ्या प्रमाणात आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंवर वापरकर्ते प्रश्न विचारत आहेत की सरफराज अहमदकडून आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे का?

हेही वाचा : IND vs PAK, T20 World Cup 2026: “हा आमचा निर्णय….” भारताविरुद्धच्या बहिष्कारावर पाक कर्णधाराने केला मोठा खुलासा

तथापि, सोशल मीडियावरील गोंधळ उडाल्यानंतर, आयसीसीकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आयसीसीने स्पष्ट केले की सरफराज अहमदला फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. कारण तो या अंडर १९ विश्वचषकात पाकिस्तान संघाचा संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक अशा दोन्ही भूमिकेत आहे. म्हणूनच सरफराजला काही विशेषाधिकार दिले गेले आहेत.

सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताने अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या सुपर ६ सामन्यात पाकिस्तानचा ५८ धावांनी धुव्वा उडवला आहे.  यासह, भारतीय संघाने सेमीफायनल २ मध्ये आपले  स्थान निश्चित केले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत वेदांत त्रिवेदीच्या अर्धशतकाच्या जोरावर ४९.५ षटकात सर्वबाद २५२ धावा केल्या. प्रतिउत्तरात पाकिस्तान संघ ४६.२ षटकात १९४ धावांवर गारद झाला आणि भारताने ५८ धावांनी विजय मिळवला. जिथे त्यांचा सामना ४ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला ३३.३ षटकांत विजय मिळवणे आवश्यक असताना, भारतीय संघाने   केवळ सेमीफायनलमध्ये स्थानच निश्चित केले नाही तर सामना देखील आपल्या खिशात टाकला.

हेही वाचा : T20 World Cup 2026: न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी ठरली रंगीत तालीम! T20 World Cup पूर्वी फॉर्ममध्ये परतले ‘हे’ खेळाडू

दोन्ही संघ खालीलप्रामाणे

पाकिस्तान U19 प्लेइंग इलेव्हन: हमजा जहूर (w), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (c), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा

भारत अंडर 19 प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (क), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यू), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

Web Title: Ind19 vs pak19 sarfaraz ahmed caught cheating by using a phone during the ongoing match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 04:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.