IND vs WI 2nd Test: Fourth day's play ends! India 58 runs away from victory; Will they give West Indies a clean sweep?
IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दूसरा कसोटी दिल्ली येथे अरुण जेटली स्टेडियमवर दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात फॉलोऑन लागलेल्या वेस्ट इंडिजने ३९० धावा उभ्या करून भारतासमोर १२१ धावांचे टार्गेट दिले. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शेवटच्या जोडी मैदानावर चांगली खेळत ७९ भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुजवले. वेस्ट इंडिजविरुद्ध विजयासाठी १२१ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने चौथ्या दिवसाच्या खेळाअखेर एका विकेटच्या मोबदल्यात ६३ धावा केल्या असून आता वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्यापासून भारत फक्त ५८ धावा दूर आहे.
हेही वाचा : IND vs WI : शाई होपने शतक ठोकले खरे, पण लाजिरवाणा विक्रम पडला झोळीत; वाचा नेमकं काय घडलं..
शेवटच्या म्हणजेच पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात, भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी ५८धावांची आवश्यकता आहे. सध्या, केएल राहुल आणि साई सुदर्शन क्रीजवर नाबाद आहेत. केएल राहुल २५ धावा तर साई सुदर्शन ३० धावा करून नाबाद आहे.
यापूर्वी, फॉलोऑन लागलेल्या वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात जॉन कॅम्पबेल ११५ आणि शाई होप १०३ यांच्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात ३९० धावा केल्या. यामुळे वेस्ट इंडिजला डावाच्या पराभवाचा धोका टळला, परंतु ते भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवण्यात अपयशी ठरले. वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
वेस्ट इंडिजच्या शेवटच्या जोडीने १० व्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचत भारताला चांगलेच जेरीस आणले. ज्यामुळे वेस्ट इंडिजला भारतावर १२० धावांची आघाडी घेता आली. जस्टिन ग्रीव्हज ५० धावांवर नाबाद राहिला. जॅडेन सील्सला बुमराहने ३२ धावांवर माघारी गेला. भारताकडून कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन, सिराजने दोन आणि जडेजा आणि सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, भारताने आपला पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला फक्त २४८ धावा करता आल्या आणि त्यांना फॉलोऑन करावा लागला.
हेही वाचा : IND vs WI : सर जडेजाचा दिल्लीत धुमाकूळ! कपिल देवचा दिग्गज विक्रम मोडून रचला इतिहास; केला ‘हा’ पराक्रम
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितिश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
वेस्टइंडीज संघाची प्लेइंग इलेव्हन : रोस्टन चेस (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, टेग्नारिन चंद्रपॉल, अॅलिक अथानासे, शाई होप, टेविन इमलाच (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, जोमेल वॉरिकन,जेडेन सील्स