Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

अगदी शेवटच्या बॉलपर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा खेळ संपवला आहे. संजू सॅमसन, सूर्यकुमार आणि तिलक कुमारच्या अप्रतिम खेळीमुळे भारताने विजयी तिलक लावला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 01, 2026 | 10:48 PM
संजू सॅमसनची तुफानी खेळी, भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

संजू सॅमसनची तुफानी खेळी, भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताने जिंकला महत्त्वाचा सामना
  • ‘करो या मरो’ सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला चारली धूळ 
  • संजू सॅमसनचा अप्रतिम खेळ 
रविवारी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ सामन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजशी सामना झाला. या सामन्यात सतत भारत आणि वेस्ट इंडिज असेच पारडे जड होत होते. नखं कुरतडणाऱ्या या सामन्यात अखेर भारताने वर्चस्व गाजवत विजय मिळवला.  ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ बाद १९५ धावा केल्या. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार होता आणि हा मान अखेर भारताने मिळवलाय. 

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. कर्णधार शाई होप आणि रोस्टन चेस यांनी ८.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. होपने ३३ चेंडूत ३२ धावा केल्या, तर चेसने २५ चेंडूत ४० धावांची शानदार खेळी केली. शिमरॉन हेटमायरने चांगली सुरुवात केली, परंतु त्याला त्याची सुरुवात मोठ्या खेळीत रूपांतरित करता आली नाही. हेटमायर १२ चेंडूत २७ धावा करून बाद झाला.

IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

संजू सॅमसनची कमाल बॅटिंग 

सुरूवातील नेहमीप्रमाणे अभिषेक शर्मा आणि इशान किशनने भारतीय चाहत्यांना निराश केले. मात्र यावेळी संजू सॅमसनने ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याला कॅप्टन सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने साथ दिली. संजू सॅमसनने एक बाजू व्यवस्थित सांभाळून ठेवली होती. या सामन्यात संजू सॅमसनने विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला. वर्ल्ड कपमध्ये सामना Chase करताना विराट कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसमोर ८२ धावा केल्या होत्या आणि संजूने हा रेकॉर्ड मोडत ९७ धावा केल्या. 

कशी होती वेस्ट इंडिजची बॅटिंग 

तथापि, शेरफेन रदरफोर्ड फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही, तो हार्दिक पंड्याकडे ९ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. रुदरफोर्डच्या जाण्यानंतर, रोवमन पॉवेल आणि जेसन होल्डर यांनी संघाची सूत्रे हाती घेतली आणि पाचव्या विकेटसाठी फक्त ३५ चेंडूत ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. होल्डरने २२ चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या. दरम्यान, पॉवेलने १७८ च्या स्ट्राईक रेटने फक्त १९ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या.

बुमराह ठरला यशस्वी 

जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. बुमराहने चार षटकांत ३६ धावा देत दोन बळी घेतले, तर हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, वेस्ट इंडिजने एक बदल केला आहे, ब्रँडन किंगच्या जागी अकील हुसेनला संधी दिली आहे.

Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

अशी होती टीम 

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश

शाई होपच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघात रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकिल हुसेन, गुडाकेश मोती आणि शमार जोसेफ यांचा समावेश

Web Title: T20 world cup 2026 india beats west indies by 5 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 10:48 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Sanju Samson
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला
1

Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य
2

IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित
3

IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

SA vs ZIM Toss Update : सिकंदर रझाने नाणेफेक जिंकले, झिम्बाब्वे पहिले करणार फलंदाजी! ZIM दक्षिण आफ्रिकेला रोखणार का?
4

SA vs ZIM Toss Update : सिकंदर रझाने नाणेफेक जिंकले, झिम्बाब्वे पहिले करणार फलंदाजी! ZIM दक्षिण आफ्रिकेला रोखणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.