Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : एजबेस्टनसाठी टीम इंडियात मोठे बदल; ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या अष्टपैलूसह ‘या’ तीन खेळाडूंची लॉटरी, ठाकूरला डच्चू

आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 02, 2025 | 03:44 PM
IND Vs ENG: Big changes in Team India for Edgbaston; Lottery of 'these' three players including the all-rounder who dominated the Australia tour, Thakur will be dropped.

IND Vs ENG: Big changes in Team India for Edgbaston; Lottery of 'these' three players including the all-rounder who dominated the Australia tour, Thakur will be dropped.

Follow Us
Close
Follow Us:

India and England 2nd Test : भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे भारताने गमावला होता. या सामन्यात  इंग्लंडने भारताला ५ विकेट्सने पराभूत करून मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळला जात आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत हा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. भारताच्या संघात तीन खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. भारताने नेमके कोणते बदल केले आहेत ते आपण पाहूया.

भारतीय संघ युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आपला दूसरा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. लीड्स येथे खेळवण्यात आलेल्या  सामन्यात भारताकडून बऱ्याच चुका झाल्या होत्या.त्यामध्ये भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि कमकुवत गोलंदाजी हे पराभवाचे खरे कारणं राहिली आहेत. दुसऱ्या सामन्यात मात्र शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याच्या प्रयत्न करणार आहे. त्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. आधीच निश्चित झाल्याप्रमाणे भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराह या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज आकाश दीपला संघात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा : Shami-Jahan Divorce Case : उच्च न्यायालयाचा मोहम्मद शमीला झटका! माजी पत्नी हसीन जहाँने दिली ‘सत्यमेव जयते’ ची हाक

तर मागील कसोटी सामन्यात साधारण कामगिरी करणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरला संघातून वगळण्यात आले आहे. आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गाजवणाऱ्या  नितीश कुमार रेड्डीला संधी देण्यात आली आहे.  तसेच लीड्स कसोटी सामन्यात पदर्पणात शून्यावर बाद होणारा साई सुदर्शनला या वेळी डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी ६ व्या क्रमांकावर खेळणारा करूण नायर फलंदाजीला उतरणार आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू खेळाडूचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.

🚨 Toss and Team Update 🚨 England win the toss and elect to bowl in the 2nd Test in Edgbaston. Three changes for #TeamIndia Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/fGmkOLai7x — BCCI (@BCCI) July 2, 2025

हेही वाचा : IND Vs ENG : भारतीय संघात होणार मोठी उलथापालथ? एजबॅस्टन कसोटीत कुणाला लागणार लॉटरी, पहा संभाव्य playing XI

एजबॅस्टन येथे इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

 एजबॅस्टन येथे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करूण नायर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप

Web Title: India and england 2nd test changes in team india thakur dropped washington sundar akash deep and reddy get a chance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • IND Vs ENG

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.